पंढरपूर भक्तीधाम धर्मशाळेस १ लाख ११ हजार १११ रुपये देणगी सुपूर्द
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे | उदास विचारे वेच करी ||

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पंढरपूर भक्तीधाम धर्मशाळेस वै हभप ज्ञानोबा मारुती जैद पाटील यांच्या स्मरणार्थ चिंबळी येथील वारकरी साधक, साधना केसरी, प्रकाश महाराज जैद पाटील यांच्या वतीने १ लाख ११ अकरा हजार १११ अकरा रुपये देणगी देण्यात आली. या देणगीचा उपयोग पंढरपूर येथील भक्तीधाम धर्मशाळेच्या विविध विकास कामास सुपूर्द करण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारी श्री संत फरताळे दिंडी क्रमांक ९ यांच्या वतीने
साधना केसरी प्रकाश महाराज जैद पाटील यांना सन्मान करण्यात आला. यावेळी वारकरी, भाविक, श्री संत फरताळे दिंडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, विश्वस्त, सभासद मान्यवर यांचे वतीने प्रकाश महाराज जैद पाटील यांचे आभार व्यक्त करीत सामाजिक बांधिलकीतून देणगी दिल्या बदल सन्मान करण्यात आला.