माऊली मंदिरात ज्ञानोबा – तुकोबा संत भेट लक्षवेधी माऊलींचे पालखी सोहळ्याची अलंकापुरीत हरिनाम गजरात सांगता
हजेरी मारुती मंदिरात हजेरी ; दर्शनास भाविकांची गर्दी

इंद्रायणी नदी घाटावर इंद्रयांची आरती ; घाट स्वच्छता उपक्रम
आळंदीत माऊलींच्या भेटीनंतर तुकोबांची पालखी देहूत प्रवेशली हरिनाम गजरात
आळंदी – देहू ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशल्या नंतर एकादशी दिनी सोमवारी ( दि. २१ ) श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी, वारकरी भाविकांचे उपस्थितीत हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विणेकरी यांचे अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या कार्यक्रमाने उत्साहात सांगता झाली. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास लाखावर भाविकांनी कामिका आषाढी एकादशी दिनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले.
यावेळी परंपरेने वसंतराव कुऱ्हाडे पाटील, श्रीधर कुऱ्हाडे पाटील, आणि डॉ. नाईक परिवाराचे वतीने नारळ व प्रसाद वाटप झाले. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात तसेच हजेरी मारुती मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. तत्पूर्वी श्री संत ज्ञानोबा – तुकोबा यांची संतभेट आळंदी मंदिरात झाली. देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांचेसह देहू संस्थानचे माजी अध्यक्ष,विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते. यावेळी श्रींचे गाभाऱ्यात पदाधिकाऱयांची गर्दीने श्री रुख्मिणी माता मूर्तीही थेट पदाधिकारी श्रींचे समोर उभे राहिल्याने झाकली गेली.
आळंदी मंदिरात संत भेट प्रसंगी आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथसाहेब, अँड.राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज लोंढे, मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, देहू संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, देहू संस्थांचे विश्वस्त मंडळ आदी मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते. पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, पुजारी अमोल गांधी, राजाभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष मानकरी राहूल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरू,स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, उपव्यवस्थापक तुकाराम महाराज माने, श्रीधर सरनाईक यांचेसह दिंडीकरी, विणेकरी मंदिरात भाविक, वारकरी यांचे दर्शनाचे नियोजनास तसेच संत भेट प्रसंगी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पहाट पूजेत परंपरेने पवमान अभिषेख आणि संत भेट प्रसंगी संत तुकाराम महाराज यांचे पादुका श्रींचे संजीवन समाधी समीप मांडत पूजा विधिवत वेदमंत्र जयघोषात करण्यात आली.
परंपरेच्या उपचारात मंदिरात परंपरेने श्रीना पवमान अभिषेख, दुधारती झाली. श्रीना नैवेद्य झाला. यावर्षी श्रींचे पालखीचे नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मंदिर प्रदक्षिणेत सोहळ्यातील दिंड्यांतील विणेकरी यांचे अभंग हजेरी मारुती मंदिरात हजेरीचे कार्यक्रमात झाले. आषाढी एकादशी तसेच संतभेट यामुळे भाविकांची गर्दी वाढली. मंदिरातुन सकाळी संत भेट झाल्या नंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने हरिनाम गजरात परतीचा प्रवास देहूकडे सुरु केला. श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि एकादशी निमित्त नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली.
ख-या अर्थाने सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात आळंदीत झाली. टाळ मृदंगाचा निनाद, हरी नामाचा जयघोष करीत श्रींचा चांदीचा लक्षवेधी मुखवटा फुलांनी सजलेल्या पालखीत विराजमान करीत श्रींचे पालखीची आषाढी एकादशी दिनी वैभवी मंदिर व नगरप्रदक्षिणा झाली. माऊलींचे पायी वारी पालखी सोहळा कालावधीत मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित परिवार तर्फे हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. यावेळी उपस्थितांना श्रवण सुखाची ज्ञानभक्तीमय पर्वणी लाभली.
आषाढी एकादशी दिना निमित्त आळंदी मंदिरात प्रथा परंपरेचे पालन करीत श्रीची पूजा, आरती, रुद्राभिषेख, पूजा,फराळाचा महानेवेद्य,धार्मिक कार्यक्रम झाले. यासाठी मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, तुकाराम माने, महेश गोखले , राजाभाऊ चौधरी, बल्लाळेश्वर वाघमारे यांचेसह सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देवस्थान तर्फे वारी सोहळ्यातील मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने श्रीधर सरनाईक, श्रीकांत लवांडे बल्लाळेश्वर वाघमारे संजय रणदिवे ज्ञानेश्वर पोंदे आदी मान्यवर, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.
हजेरी मारुती मंदिरात श्रीचे पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीकरी यांची अभंग रुपी सेवा होवून हजेरी घेण्यात आली. यावेळी परंपरांचे पालन करीत श्रीधर कुऱ्हाडे पाटील परिवार व नाईक परिवार यांचे तर्फे नारळ प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. यासाठी वसंतराव कुऱ्हाडे, चंद्रकांत कुऱ्हाडे, पंकज कुऱ्हाडे, प्रवीण कुऱ्हाडे, सुधीर कुऱ्हाडे, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, सुनील रानवडे, नितीन साळुंखे, आळंदीकर ग्रामस्थ आदींसह नवशिव शक्ती तरुण मंडळाने परिश्रम घेतले. हजेरी कार्यक्रमा नंतर श्रींची पालखी मंदिरात हरिनाम गजरात आली. मंदिर प्रदक्षिणा, आरती, मानकरी यांस देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले. या नंतर श्रींची आरती झाली. पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी आरती, नारळ प्रसाद वाटप झाले. या सोहळ्याचे सांगते दिनी श्रींचे पालखीची मंदिरात प्रदक्षिणा उत्साहात झाली.
श्रींचे पालखी सोहळयाचे यशस्वीतेसाठी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ रंधवे चोपदार, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चीतळकर पाटील, योगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे, श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी, अमोल गांधी आदींनी परिश्रम घेतले.
इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता ; इंद्रायणी आरती उत्साहात
इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा संयोजिका अनिता झुजम,शिळा कुलकर्णी, नीलम कुरधोंडकर, माजी नगरसेविका उषा नरके, शोभा कुलकर्णी, कौसल्या देवरे, सरस्वती भागवत, नंदा भामरे, त्रिवेणी वालकर, सविता वरळीकर, छाया वरळीकर, संगीत महामुनी, बाबुराव मोरे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्ण काळे, सुरेखा काळभोर, शाळां होनावळे, अनिता शिंदे, लक्ष्मी जाधव, संगीत काळे, दिनकर तांबे, अमर गायकवाड, सुहास सावंत, ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद ठाकूर आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान श्रींचे पालखी सोहळ्याचे काळात शांतता, कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासह, सुरक्षित सुरळीत वाहतूक ठेवण्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शनात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि पोलीस सेवक, कर्मचारी, अधिकारी यांनी प्रभावी बंदोबस्त देत सेवा रुजू केली.
आळंदीत माऊलींच्या भेटीनंतर तुकोबांची पालखी देहूत विसावली
आळंदीत सुमारे १७ वर्षांनंतर एक दिवसाच्या मुक्कामास संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला होता. श्री संत ज्ञानेश्वर महारांजांची भेट घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा ३५ दिवसांचा प्रवास करून सोमवारी ( ता. २१ ) देवभूमी देहूनगरीत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार कमानीत प्रवेशाला. पहाटे आळंदीतून पालखी निघाल्यानंतर आळंदी ते देहू दरम्यानच्या डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे व विठ्ठलनगरच्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून स्थानिक गावकऱ्यांनी पालखीचे स्वागत केले व पादुकांचे दर्शन घेतले. देहू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे पारंपारिक पध्दतीने भक्तीमय, उत्साहात , आनंदमयी वातावरणात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.
देहूत मुख्य महाद्वार प्रवेशद्वार येथे पालखीचे दुपारी साडेचारच्या सुमारास आगमन झाले. यावेळी आभाळ हि होते. मेघराजानी जल वर्षावाचा शिडकाव करत सोहळ्याचे स्वागत केले. पालखीच्या मार्गात यावर्षी बदल झाला होता. पंचक्रोशीतील नागरिक श्रींचे पालखी सोहळ्याचे स्वागतास उपस्थित होते. सोहळ्याचे परंपरांचे पालन करीत पहाटे नित्यपूजे नंतर तीर्थक्षेत्र आळंदीहून वारकरी दिंडेकरी आणि भाविकांसह पालखी सोहळा तीर्थक्षेत्र देहूकडे मार्गस्थ झाला.
पालखी मार्गावरील डुडुळगाव, मोशी ,कुदळवाडी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर येथील ग्रामस्थांनी पादुकांचे दर्शन घेतले. देहू, विठ्ठलनगर येथील श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिर येथे ट्रस्टच्या वतीने पालखीचे स्वागत झाले. अभंग, आरती झाल्यानंतर ग्रामस्थांनी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. यावेळी महिलांची गर्दी होती. सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यासंह पालखी रथाच्या बैलजोडीला औक्षण केले. रामचंद्र तुपे कुटूबियां तर्फे मुख्य प्रवेशद्वाराजवळ भक्तीभावाने दही भाताचे महानैवद्य वाढविण्यात आला. देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, माजी अध्यक्ष,विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी सोहळा आल्यानंतर रथातून पालखी खांदेकऱ्यानी खांदयावर घेतले. चौकातील हनुमान मंदीरा समोर अभंग घेत पालखी मार्गाने सोहळा मुख्य मंदिराकडे आला. श्रींचा पालखी सोहळा महाराजांच्या जन्मस्थाना समोर आरती झाली. पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यावर चांदीची अब्दागिरी, गरूड टक्के, सावलीते रेशमी छत्र, पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणा झाली. प्रदक्षिणा नंतर पालखी मंदिरातील भजनी मंडपात आल्यावर श्री विठ्ठल-रुख्मीणी मंदिरात आरती नंतर उपस्थित वारकऱ्यांनी ” पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ” नामाचा जयघोष करीत पताका उंचवून तुतारी, शंख, नगारा व ताशाच्या गजर नाद केला.
यावेळी मंदिरात वातावरण भक्तिमय झाले होते. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी,मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्यास बंदोबस्तास पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी सोहळ्यातील सहभागी मान्यवरांचे देवस्थान तर्फे आभार व्यक्त झाले. सोहळयाची मोठ्या आनंददायी, भक्तीमय वातावरणात सांगता झाली.