मराठी

२६/११ केस’चे वास्तव तत्कालीन सरकारी वकील, भाजप’वासी अँड उज्वल निकम यांचे कडुन भांडारींनी समजून ध्यावे..! ऊथळ, तथ्यहीन व हास्यास्पद विधाने करू नयेत..- काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

Spread the love

पुणे – २६/११ केस’चे वास्तव तत्कालीन सरकारी वकील व भाजप’चे लोकसभेचे ऊमेदवार अँड उज्वल निकम यांचे कडुन माधव भांडारी यांनी समजून ध्यावे व मगच ऊथळ व हास्यास्पद आरोप करावेत असा खुलासा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या २६/११ च्या हल्ल्यात काँग्रेस चा हात” या आरोपावर, ऊत्तर देतांना सांगीतले..!
ते पुढे म्हणाले की,  २६/११ अतिरेकी हल्ला तेंव्हाच्या काँग्रेस शासन काळात सक्षम पोलीस अघिकाऱ्यांनी जीवावर जोखीम घेऊन प्रसंगी शहीदत्व स्वीकारून अजमल कसाब यास पकडले व त्यास एनकाऊंटर ने नव्हे तर रितसर न्यायीक प्रक्रिया चालवून फाशी दिली.. अजमल कसाब असो वा अफजल गुरू या अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा देणारे काँग्रेस सरकारच होते मात्र भाजप शासीत काळात, कंदहार येथे अतिरेक्यांना सोडण्याचे काम वा संसदेवर गोळीबाराची नामुष्की, काश्मिर पंडीतांची हत्या वा पुलवामा मधील ४० सीआरपीएफ जवानांची हत्या वा चिन कडुन घुसखोरी व २० भारतीय जवानांची हत्या हे सर्व देशास नामुष्की आणणारे प्रकार व हल्ले मात्र ‘भाजप सत्ताकाळातच’ झाले याचा खरेतर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आकलन करावे, बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी व तथ्यहीन वक्तव्ये ऊठसूठ काँग्रेस वर पुन्हा करू नयेत अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!