आजच्या महिलांनी जिजामातांची भूमिका बजावण्याची गरज!_ना. चंद्रकांतदादा पाटील
‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिणींचा एकत्रिकरण सोहळा संपन्न

Pune.नवीन पीढि संस्कारक्षम घडविण्यासाठी महिलांनी जिजामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पीढिवर संस्कार केले पाहिजेत. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये राबविण्यात आलेल्या ‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिण महिलांचा एकत्रिकरण सोहळा आशिष गार्डन येथे संपन्न झाला. यावेळी उद्योजिका स्मिता पाटील, माजी नगरसेविका आणि भाजपा मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका अँड वासंती जाधव, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यामुळे शिवाजी महाराज घडले आणि त्यांनी हिंदवी साम्राज्य उभा केलं. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो. त्यामुळे नवीन पीढि संस्कारक्षम घडविण्यासाठी महिलांनी जिजामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पीढिवर संस्कार केले पाहिजेत,
ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी मंदिरांची पुनरबांधणी केली. त्याशिवाय त्यांचा राज्य कारभार इतका आदर्श होता की, त्यांनी आजही त्यातील काही मूल्ये ही दीशादर्शक आहेत. त्यांच्यासोबतच, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, सावित्रीमाई फुले, महाराणी ताराराणी यांसारख्या अनेक महिलांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यामुळे तसाच आदर्श आजच्या महिलांनी उभा करावा, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला कोथरुडमधील अनेक माहिला आणि रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या झाल उपक्रमातील अनेक नववधू उपस्थित होत्या. त्यापैकी काहींनी ना. पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.