पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !!
दिएगो ज्युनिअर्स, चेतन एफसी, डेक्कन इलेव्हन, आयफा एफसी, इंद्रायणी एफसी संघांची विजयी कामगिरी !!

बावधन येथील हॉटफुट फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अव्वल (सुपर) श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये दिएगो ज्युनिअर्स अ संघाने थंडरकॅट्झ संघाचा ३-१ असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये शुभम महापडी, ॲश्ले विन्सेंट, अन्श वाघमारे आणि चाला जॉन यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाचा विजय मिळवला. कपिल पटवर्धन, प्रमोद आत्रे आणि यश कोटेकर यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर चेतन एफसी संघाने गनर्स एफसी संघाचा ३-१ असा सहज पराभव केला. डेक्कन इलेव्हन अ संघाने केपी इलेव्हन संघाचा ४-० असा सहज पराभव केला. इशान सुमंत याने दोन गोल केले. क्रीश अहीर आणि अविनाश त्रिपाठी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये आयएफा अ संघाने परशुरामियन्स् संघाचा ३-० असा सहज पराभव केला. रियान यादगिरी, ओंकार नाले आणि असद सय्यद यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. मकरंद हरदेव आणि असय राठोड यांनी केलेल्या दोन गोलांच्या जोरावर इंद्रायणी एफसी अ संघाने जीओजी एफसी अ संघाचा २-१ असा पराभव केला. उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड अ संघ आणि रिअल पुणे युनायटेड अ संघ यांच्यामधील सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला. स्निग्मय एफसी पुणे आणि संगम यंग बॉईज अ या संघातील सामना २-२ अशा बरोबरीत सुटला. स्निग्मय एफसी पुणे संघाकडून अमित जोशी आणि सुदीप मोरे यांनी तर, संगम यंग बॉईज अ संघाकडून सुबोध लामा आणि हर्ष जोशी यांनी गोल नोंदविले.
सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः अव्वल श्रेणी गटः
१) दिएगो ज्युनिअर्स अः ४ (शुभम महापडी ५ मि., ॲश्ले विन्सेंट १४ मि., अन्श वाघमारे ३९ मि., चाला जॉन ४७ मि.) वि.वि. थंडरकॅट्झ अः १ (यश लोणारे ६० मि.); पुर्वार्धः ३-०;
२) चेतन एफसीः ३ (कपिल पटवर्धन २५ मि., प्रमोद आत्रे २९ मि., यश कोटेकर ८० मि.) वि.वि. गनर्स एफसीः १ (जयंत निंबाळ ५९ मि.); पुर्वार्धः २-०;
३) उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड अः ० बरोबरी वि. रिअल पुणे युनायटेड अः ०;
४) डेक्कन इलेव्हन अः ४ (इशान सुमंत २, ८ मि., क्रीश अहीर २० मि., अविनाश त्रिपाठी ३५ मि.) वि.वि. केपी इलेव्हनः ०; पुर्वार्धः ४-०;
५) आयएफा अः ३ (रियान यादगिरी २४ मि., ओंकार नाले ३३ मि., असद सय्यद ५१ मि.) वि.वि. परशुरामियन्स्ः ०; पुर्वार्धः २-०;
६) स्निग्मय एफसी पुणेः २ (अमित जोशी १ मि., सुदीप मोरे ५१ मि.) बरोबरी वि. संगम यंग बॉईज अः २ (सुबोध लामा ४ मि., हर्ष जोशी ७ मि.); पुर्वार्धः १-२;
७) इंद्रायणी एफसी अः २ (मकरंद हरदेव १७ मि., असय राठोड ७८ मि.) वि.वि. जीओजी एफसी अः १ (प्रकाश थोरात ६० मि.); पुर्वार्धः १-०;