चिखलवाडी येथील पिण्याच्या पाण्याचे नागरिकांच्या वतीने उदघाटन आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची जल्लोष करत साथ

पुणे.पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमित जावीर,विजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आणि महापालिका आयुक्त,पाणीपुरवठा मुख्य अभियंता यांना केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी नागरिकांच्या वतीने चिखलवाडी येथील पाण्याच्या टाकीचे कोक खुले करत नागरिकांना बिनकामी नेत्यांच्या श्रेयासाठी होणाऱ्या बेकायदेशीर उद्घाटनना साठी न थांबता पाणी सोडण्यात आले.
*नागरिकांसाठी हेच भव्य उदघाटन आहे.* पिण्याचे पाणी कोणत्या उद्घटनासाठी थांबवू नये हीच राष्ट्रवादी काँग्रेस ची भूमिका होती.
म्हणूनच आज लाडू वाटत उदघाटन करण्यात आले.यावेळेमहिला अध्यक्ष नूतन ताई गायकवाड,सामाजिक न्याय अध्यक्ष युवराज जेटीथोर,उपाध्यक्ष जवलेकर, संघटक सचिव आनंद चव्हाण,रवी पिल्ले,स्वामी अण्णा,शिंदे भाऊ,युवक शहर सरचिटणीस रोहित बोयत,आकाश केंगार,आशु जाधव,आगळे ताई,मनोरमा ताई,भागातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व उपस्थित यांचे आभार.
ज्यांनी इतके वर्ष मतदानासाठी पिण्याच्या पाण्यासाठी तरसवले,त्यांच्या तर्फे उद्घाटन नको पणो पण कडू लागेल.. तर खरे ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या हातून शुभारंभ झाला पाहिजे पाणी गोड लागेल अशी नागरिकांनी भावना व्यक्त केले…