आलंदीब्रेकिंग न्यूज़मराठी

अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाची माती कारागीर राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात  

पॉटरी ट्रेनिंग घेऊन एक कुंभार महिना पन्नास हजार ते एक लाख मिळवतो :- डॉ एस पी मिश्रा

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ आणि वंश पारंपारिक इंटरप्रूनर्स अँड आर्टिजन्स चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया तर्फे माती कारागिरांच्या विकासावर राष्ट्रीय परिसंवाद मुंबई फ्रुट वाला धर्मशाळा आळंदी येथे उत्साहात झाली.

खादी ग्रामोद्योग आयोगाचे माजी संचालक व महात्मा गांधी ग्रामीण संशोधन संस्था वर्धाचे वरिष्ठ संशोधक कुंभार कलेचे तज्ञ डॉ. शशि प्रकाश मिश्रा यांनी खादी ग्रामोद्योग आयोगा च्या माध्यमातून हजारो कुंभार कारागिरांना ट्रेनिंग दिले. त्यांना अत्याधुनिक मशीन्स अत्यल्प किमतीत दिल्या आणि त्यांचे उत्पन्न वाढवले.

यावेळी बोलताना डॉक्टर मिश्रा म्हणाले की खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून पॉटरी ट्रेनिंग घेऊन अत्याधुनिक मशनरी च्या साह्याने अनेक वस्तू करणारा एक कुंभार परिवार सध्या महिन्याला कमीत कमी ५० हजार ते एक लाख रुपये उत्पन्न कमवत आहे. गोरगरीब कुंभार कारागिरांसाठी डॉ. मिश्रा साहेब यांनी अहोरात्र काम केले म्हणूनच त्यांना प्रजापती रत्न हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ, पुष्प गुच्छ व भव्य ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशजी कुंकळेकर उपस्थित होते, व्यासपीठावर गुजरात मधील माजी राज्यसभा सदस्य दिनेश अनावाडिया , गुजरातचे माजी आमदार गोविंदभाई प्रजापती, गोव्याचे आमदार प्रमेंद्र शेट ,राजस्थान माती काला बोर्डाचे अध्यक्ष प्रल्हाद टाक, छत्तीसगड माती कला बोर्डाचे अध्यक्ष शंभूनाथ, राष्ट्रीय महासचिव मनोज प्रजापत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगनाथ सूर्यवंशी, विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत, माजी अध्यक्ष शाम शेठ राजे, राष्ट्रीय माती कला सेलचे अध्यक्ष दत्ता कुंभार, राष्ट्रीय संयोजक आर बी के प्रजापती,लुनचंद सीनावाडिया आदी मान्यवर उपस्थित होते

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गोरोबाकाका प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना दत्ताजी कुंभार म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभार समाज बांधवांना तीन हजार यांत्रिक चाके, अनेक ब्लंजर, पगमील, जिगर जॉली इत्यादी मशीन अल्प किमतीत देऊन कुंभार समाजाचे उत्पन्न पाचपट करण्याचे काम आपल्या टीमने केले आहे.

गुजरात येथील मिट्टी कूल या कंपनीचे संस्थापक मनसुख भाई प्रजापती यांना प्रजापती रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी अल्प शिक्षण घेतले असून सुद्धा मोठी कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत मातीचा फ्रिज, भांडी, तवे ,पाण्याच्या बाटल्या व पातेली इत्यादी सुमारे शंभर वस्तूंचे निर्माण करण्यात येते. त्यांच्या ब्रँडचे त्यांनी पेटंट घेतले असून सुद्धा प्रजापती कुंभार समाजातील सर्व लोकांनी त्या वस्तूंची कॉपी करावी आणि आपली उपजीविका चांगल्या रीतीने चालवावी असे त्यांनी जाहीर पणे सांगितले. त्याकरिता लागणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

डॉ. के के वर्मा व अंजनी किरोडीवाल यांनी मातीच्या भांड्या मधील स्वयंपाकाचे महत्त्व सांगितले. मातीच्या भांड्या मधून केलेल्या खाद्य पदार्थांच्या जेवणाने बीपी शुगर व इतर अनेक आजार होत नाहीत. असे मत त्यांनी शास्त्रीय आधार देऊन मांडले.

केंद्रीय ग्रामीण कुम्हारी प्रशिक्षण इन्स्टिट्यूट खानापूर कर्नाटक चे प्राचार्य वेंकटेश कुंभार यांनी संस्थेत चालवित असलेल्या कुंभार काम प्रशिक्षण बाबत माहिती दिली. प्रजापति महासंघाने खानापूरचे केंद्रीय कुम्हारी प्रशिक्षण संस्था केंद्र सरकार नवी दिल्ली या संस्थेस प्रजापती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना पॉटरी ट्रेनिंग दिले आणि फक्त कुंभार समाजातील नव्हे तर सर्व समाजातील अनेक उद्योजक निर्माण केले.

मातीचे अलंकार बनवणाऱ्या दीपा सोनजी गुरव यांना प्रजापती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, कोरोना मध्ये नोकरी गेल्यानंतर खानापूर पॉटरी इन्स्टिट्यूट बेळगाव येथे त्यांनी पॉटरी प्रशिक्षण घेतले व मातीच्या अलंकाराचे निर्माण कार्य सुरू केले. या अलंकारांना खूप मोठी मागणी आहे. त्यांच्या पगारा पेक्षा जास्त उत्पन्न यातून त्या सध्या मिळवत आहेत असे त्यांनी सांगितले.

जयपूरच्या राजेंद्र अर्जुन प्रजापति यांना प्रजापती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी ७५ फूट उंचीचा धातूचा पुतळा राजस्थान मध्ये निर्माण केला आहे. शिल्पकार विनायक यमाजी श्रीमंदिरकर यांनी राष्ट्रीय संयोजक आर बी के प्रजापती यांचे हुबेहूब मातीचे शिल्प कार्यक्रमाच्या स्थळी तयार करून सर्वांची वाहवा मिळवली. ते श्रीमंदिलकर फाईन आर्ट कॉलेज मुंबईचे प्राचार्य आहेत त्यांना सुद्धा प्रजापती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिल्पकार सीमा खेडकर शिर्के पुणे, शिल्पकार गणेश कुंभार उरळी, शिल्पकार संजयराव काळे अहिल्यानगर यांना या प्रसंगी प्रजापती भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमृत मातीचे अंजनी किरोडीवाल, अविनाश कुंभार, वाल्मीक शिरसाठ, ज्ञानेश्वर कुंभार, नितीन राजे, ज्ञानेश चिंदरकर, दामा प्रभाकर, शेखर कुडाळकर यांनी जिगर ज्वाली व अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून कुंभार कलेमध्ये प्राविण्य मिळवून उत्कृष्ट उद्योजक म्हणून महत्वपूर्ण स्थान मिळवल्याबद्दल त्यांना प्रजापती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मातीच्या मूर्ती बनवणारे कलाकार रमाकांत नारायण, जयदेव शेट, अमरबाहू शेट, सोमनाथ कुंभार, अनिल शेटकर, खुशाली शेठ, गोपाळ शेटकर, संजय पळसकर, राजेंद्र बेहेरे, विनोद मांजरमपल्ली या मान्यवरांना मूर्ती कलेत योगदानाबद्दल प्रजापती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वीट उद्योजकातील युवा उद्योजक कृष्णा सोनवणे नाशिक, पद्माकर शिरसाठ जळगाव, रमेश प्रजापति इंदौर व सुधाकर कुंभार बारामती यांना प्रजापती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. एस पी मिश्रा यांना प्रजापती रत्न पुरस्कार प्रदान या प्रसंगी डावी कडून शिवानंद, मनोज प्रजापती, प्रल्हाद टाक, आर बी के प्रजापती,प्रमेंद्र शेट, डॉ. मिश्रा, सतीश कुंकळेकर, दिनेश अनावाडिया, नागनाथ कुंभार, रंगनाथ सूर्यवंशी यांचे उपस्थितीत पुरस्कर प्रदान करण्यात आला.

कुंभश्री संपादक संजय राजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button