सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा निकाल शंभर टक्के
फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्याकडून कौतुक

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी, पालक आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीमुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘‘सूर्यदत्तमध्ये सर्जनशीलतेसोबत शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांची ही कामगिरी त्यांच्या मेहनतीसह प्राध्यापकांच्या समर्पित कार्याची पावती आहे. भविष्यात हे विद्यार्थी जागतिक फॅशन क्षेत्रात यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून पुढे येतील, असा विश्वास आहे.’’
संस्थेच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘एसआयएफटी’च्या प्राचार्या डॉ. सायली पांडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, नवोपक्रम आणि सर्वांगीण विकासाच्या ध्येयधोरणामुळे सातत्याने यश मिळत असल्याचे सांगितले.
‘एसआयएफटी’च्या स्थापना २०१० मध्ये झाली असून, आतापर्यंत १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. फॅशन डिझाईन, रिटेल व्यवस्थापन, फ्रीलान्सिंग, अॅक्सेसरीज डिझाईन आणि उद्योजकता या क्षेत्रांत अनेक विद्यार्थी यशस्वीपणे कार्यरत आहेत. याशिवाय, ‘आयआयआरएफ बेस्ट डिझाईन कॉलेज सर्व्हे २०२४’मध्ये सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनला देशात १५ वा आणि राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.



