पुणेकरांसाठी मोफत दंत व नेत्र उपचारांची सुविधा सुरू!
: पुणे महानगरपालिकेच्या वतीने कै.द्रोपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल बोपोडी येथे मोफत दंत व नेत्र तपासणी आणि उपचार केंद्राचे उद्घाटन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कै.द्रोपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल बोपोडी येथे मोफत दंत व नेत्र तपासणी आणि उपचार केंद्राचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी उपमहापौर परशुराम वाडेकर याच्या शुभहस्ते करण्यात आले.या केंद्रामध्ये एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व उपचार, तसेच डी.वाय.पाटील डेंटल कॉलेजच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी व उपचार नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. ही सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी मा.उपमहापौर सौ.सुनीता परशुराम वाडेकर यांनी विशेष पुढाकार घेतला.
यावेळी कै.बाबुराव शेवाळे दवाखान्यात लवकरच मोफत कॅन्सर केअर,डायग्नोस्टिक व सपोर्ट सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच संजय गांधी रुग्णालय, बोपोडी येथे अत्याधुनिक ICU बेडची सुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असा विश्वास देण्यात आला.
या कार्यक्रमास माजी उपमहापौर सौ.सुनीता परशुराम वाडेकर, नगरसेवक श्री.सनीदादा निम्हण, नगरसेविका श्रीमती भक्तीताई गायकवाड, नगरसेविका श्रीमती सपनाताई छाजेड, श्रीमती.शैलेजाताई खेडेकर
(मा.नगरसेविका )
पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर (IAS), आरोग्य प्रमुख डॉ.नीना बोराडे, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.नितीन धमाले, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.संतोष मराठे यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



