ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

पशुसंवर्धन आयुक्तालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

Spread the love

पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-67 : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. किरण पाटील म्हणाले, “आजचा दिवस आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगण्याचा, तसेच स्वातंत्र्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या देशभक्तांना अभिवादन करण्याचा आहे. महापुरुषांनी या देशासाठी केलेले त्याग व समर्पण यापासून सदैव प्रेरणा घेऊन आपण मार्गक्रमण केले पाहिजे. उत्कृष्ट लोकसेवेच्या माध्यमातून शासन व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा आहे. तसेच सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे व समर्पित सेवेमुळेच आपला विभाग आज १३४ वर्षांची गौरवशाली परंपरा यशस्वीपणे पुढे नेऊ शकत आहे.”

उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करून उच्च पदांवर पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करत डॉ. पाटील पुढे म्हणाले की, आगामी काळात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या सर्व संवर्गांतील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन करून, विशेष कार्यक्रमांद्वारे त्यांचा गौरव केला जाईल.

गेल्या काही दिवसांत विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे नमूद करत ते म्हणाले, “येत्या काळात पशुसंवर्धन विभागात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील. यामुळे प्रत्येकाच्या वैयक्तिक कलागुणांना वाव मिळून आपला विभाग एका नव्या उमेदीने व आत्मविश्वासाने कार्य करेल.” मनोगताच्या शेवटी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय) डॉ. शैलेश केंडे, सहआयुक्त (पशुधन व नियोजन) डॉ. देवेंद्र जाधव, सहआयुक्त (गुणनियंत्रण) डॉ. प्रशांत कांबळे, सहआयुक्त (आयव्हीबीपी) डॉ. याहयाखान पठाण, प्रादेशिक सहआयुक्त (पुणे विभाग) डॉ. समीर बोरकर, सहआयुक्त (पशुआहार) डॉ. सुनील पसरटे, सहआयुक्त तथा सदस्य सचिव (गोसेवा आयोग) डॉ. शामकांत पाटील, सहसंचालक (सांख्यिकी) श्रीमती शिल्पा पांडे, उपआयुक्त तथा सदस्य सचिव (महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण) डॉ. प्रशांत भड, उपआयुक्त पशुसंवर्धन (महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ), लेखा व वित्त अधिकारीश्री. संदेश ओहाळ आदिंसह आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान:

डॉ. भगतसिंग कदम, डॉ. राजू कोलते, डॉ. धनाजीराव पाटील, डॉ. सुभाष बोरकर, डॉ. आशिष पवार, डॉ. हर्षला ठुबे, डॉ. विशाल केचे, डॉ. ऋषिकेश जगताप, श्री. आण्णासाहेब खरात, श्रीमती दैवशाली चव्हाण, श्रीमती आदिती जावळीकर, श्री. संतोष कापडणी, श्री. कुणाल कदम, श्री. संतोष पवार, श्री. योगेश सावंत, श्रीमती तनुजा मुकणे आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!