ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्रशहर

दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या  तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विद्यापीठ प्रशासनाला निर्देश

Spread the love

मुंबई :-  राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालकडॉ प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल ,उपसचिव प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू, अधिकारी (ऑनलाईन) व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
शासनाच्या निर्देशांचे पालन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी. तसेच, शासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची दखल घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना दिलासा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!