रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा….. सरपंच रणजित गाडे
डॉ देशमुख क्लिनिक डे केअर सेंटर शुभारंभ

आता येलवाडी मध्ये लहान मुलाचे वैद्यकीय सेवेचा डॉक्टर देशमुख क्लिनिक शुभारंभ
पिंपरी चिंचवड ( बद्रीनारायण घुगे ):स्वतंत्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर 15 ऑगस्ट पासून आपल्या ग्राम येलवाडी परिसरात डॉ.देशमुख यांचे दवाखान्याचे उद्घाटन दिनांक 15 ऑगस्ट रोजी येलवाडीचे लोकनियुक्त सरपंच रणजित विठ्ठल गाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
या उद्घाटन प्रसंगी गावातील प्रतिष्ठान मंडळी व नागरिक होते डॉक्टर देशमुख क्लिनिक यांचे दवाखान्याचे उद्घाटन झाल्यानंतर सरपंच रणजित गाडे यांनी प्रतिपादन केले या गावांमध्ये या दवाखान्याची लहान मुलाची साठी अत्यंत गरजेचे होते रुग्णसेवा म्हणून डॉ सत्यम देशमुख यांनी हा निर्णय घेतला असुन. आनंदाची बाब आहे
“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” याचा अर्थ आहे की रुग्णांची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे, हेच ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे. हा एक महत्वाचा विचार आहे जो मानवतेवर आणि सेवाभावावर जोर देतो. याचा अर्थ असा होतो की, रुग्णांना मदत करणे, त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न करणे, हे एक पवित्र कार्य आहे. असे बोलले त्याप्रमाणे भावि सरपंच जिवन बोत्रे यांनी सुद्धा बोलले कि डॉ म्हणजे सर्व रुग्णांसाठी देवदुत आहे
डॉ देशमुख दवाखान्यात विविध सुविधा इ. सी जी नेबुलायझर सर्व प्रकारच्या तपासण्या आहे
या वेळी येलवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच रणजित गाडे भावि सरपंच जिवन बोत्रे सोसायटी चेअरमन शंकर गाडे पोलीस पाटील प्रदिप विक्रम बोत्रै गायकवाड विजय देशमुख राजेश देशमुख शुभम देशमुख डॉ सत्यम देशमुख सर्व ग्रामस्थ उपस्थित होते