आळंदी घरगुती – सार्वजनिक गणेश मूर्तींचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन
सामाजिक, पौराणिक देखावे चित्ररथ लक्षवेधी

समाजप्रबोधन मिरवणूक परंपरा कायम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पंचक्रोशीत हरिनामगजर, ढोल ताशांसह घंटेचा ठणठणाट, वारकरी संप्रदायातील पोशाखांसह विविध लक्षवेधी वेशभूषा करीत मिरवणुकांतून श्री गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशी दिनी रात्री उशिरा श्रींचे विसर्जन झाले. यावेळी लहानग्यापासून अगदी वृद्ध महिला, पुरुष आपले वय विसरून मिरवणुकीत सहभागी झाले होते. आळंदी नगरपरिषद, आळंदी – दिघी पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस यांनी गणेश मंडळांत सुसंवाद साधत मिरवणूक पोलीस बंदोबस्तात कायदा सुव्यवस्था कायम राखत शांततेत पार पडली.
यावेळी गुलाल, भंडारा, पुष्प वृष्टी, रंगीबेरंगी कागदी पाकळ्यांची उधळण करीत फटाक्यांचे आतिषबाजी भव्य दिव्य अशा मिरवणुकीने श्रींचे विसर्जन करीत पुढील वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरयाचे नाम जयघोषात आनंद सोहळ्याची सांगता झाली.
अनंत चतुर्दशी दिनी आळंदी पंचक्रोशीतील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळातील श्री गणेश मूर्तीला निरोप देत गणेशोत्सवाची सांगता भावपूर्ण वातावरणात झाली. आळंदी आणि पंचक्रोशीत विविध ठिकाणी गणेश मंडळांनी ढोल ताश्यांसह घंटा वाजवीत पारंपरिक प्रथा परंपरांचे पालन करीत मिरवणुकीने श्रींचे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने केले. या मिरवणुकीत अगदी संबळ वाद्य देखील वाजविण्यात आले. येथील महाकाल महाआरती डमरू वाद्यात जिवंत देखावा सादरीकरण करण्यात आले. शिवतेज मित्र मंडळाने गोव्यातील शिमगा सणाची परंपरा मिरवणुकीत सादर केली. आनंद सोहळ्याची सांगता आकर्षक पुष्पसजावट, विद्युत रोषणाई रथ, फटाक्यांची आतषबाजीने हि काही मंडळांनी केली.
घरगुती गणेश विसर्जन उत्साही आनंदी वातावरणात लहानग्यानी देखील गणपती बाप्पा मोरयाचा सूर आळवीत भावपूर्ण वातावरणात केले. आळंदी नगरपरिषदेने ६ ठिकाणी तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांनी २ ठिकाणी हौद्यांची व्यवस्था करीत श्रींचे मूर्तीचे कृत्रिम पाण्याच्या हौदात वेड मंत्र जयघोषात विसर्जन करीत श्रींचे मूर्ती आळंदी नगरपरिषद मूर्ती संकलन केंद्रात दान दिल्या. यास परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी सांगितले.
आळंदीतील धर्मराज ग्रुपने साडेतीन पीठ देवींचा भव्य निरवणुकीत देखावा सवाद्य आणला. धर्मराज ग्रुपने साडेतीन पीठ देवींचा, कडक लक्ष्मी, संबळ वाद्यात, शिवतेज मित्र मंडळाने गोव्यातील शिमगा उत्सव परंपरा यात श्रींची पालखी, लक्षवेधी पारंपरिक वाद्य, युवकांचे नृत्य, आकर्षक वेशभूषा मुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली. जय गणेश प्रतिष्ठाण अध्यक्ष गोविंद कुर्हाडे यांनी घराचे घरपण हरवलय हा समाज प्रबोधनाचा उपक्रम सादर करीत जनजागृती करणारा जिवंत देखावा प्रदर्शित करीत उपस्थितांची दाद मिळवली. घरातील पालकांचे मुलांवर लक्ष केंद्रित देखावा, वेळ, प्रेम यावर प्रबोधन, घरातील मुलगी प्रेम असणाऱ्या मुला बरोबर पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिची परिस्थिती, मुलाने फसवल्याने तिची झालेली फरफट, माहेरी आल्यावर आई, वडील यांचे मिळणारे प्रेम आस्था असे भावनिक प्रसंग सादर करत भाविकांची दाद मिळवली.
आळंदीतील जय गणेश ग्रुपने बाराज्योतिर्लिंग, महाकाल आरती, डमरू नाद, नृत्य, नंदी असा भव्य देखावे मिरवणुकीत आणून लक्ष वेधले. माजी उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी मंडळाचे नावलौकिकास साजेसा देखावा आणि मिरवणूक काढत नागरिकांचे लक्ष वेधले. व्यापारी तरुण मंडळाने श्री विठ्ठल रुक्मिणी, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा देखावा पुष्पसजावट, ढोल ताश्यांचे नाम जयघोषात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली. ज्ञानराज मित्र मंडळाने पावनखिंड चित्ररथ, पालखी ढोल ताशा सह मिरवणूक काढली. शिवस्मृती प्रतिष्ठाणने १५ फुटी लालबाग राजा मूर्तीची ढोल ताश्यांचे गजरात मिरवणूक काढली. एकलव्य प्रतिष्ठानने ढोल ताश्यांचे साथीत आकर्षक सजावट केलेला रथ मिरवणुकीत आणला. स्व. बाबाशेठ मुंगसे पाटील यांचे मंडळाने हनुमान, वानर सेना जिवंत मानवी देखावा सादर केला. यावेळी ढोल ताश्यांचे सवाद्य मिरवणूक झाली. सुवर्णयुग मित्र मंडळाने ढोल ताशांचे गजरात आकर्षक विद्युत रोषणाई करत सवाद्य मिरवणूक झाली.न्यु दत्त ग्रुपने ढोल ताश्यांचे गजरात श्रींचे विसर्जन मिरवणूक केली. वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनी शहरातील वारकरी संप्रदायातील परंपरा जोपासत टाळ, मृदंग, विना त्रिनाद करीत हरिनाम गजरात श्रींचे विसर्जन नंजय घोषात केले. जय गणेश प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद कुऱ्हाडे पाटील यांनी श्रींचे विसर्जन मिरवणूक मध्ये जिवंत देखावा सादर करीत जनजागृती केली. धर्मराज ग्रुप ,जय गणेश ग्रुप, शिवतेज मित्र मंडळ, मुंगसे पा. प्रतिष्ठाण, व्यापारी तरुण मंडळ यांच्या श्रींचे विसर्जन मिरवणुका आकाश लक्षवेधी झाल्या. यावेळी पंचरोशीतून गणेश भक्त नागरिकांची मिरवणूक पाहण्यास गर्दी झाली होती. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दक्षता बाळगत मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रभावी नियोजन करीत सुसंवाद साधला. आळंदी शहरात, पंचक्रोशीत शांततेत श्रींचे गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या.
एकत्व प्रतिष्ठानने बळ एकत्वाचे बोध वाक्य घेऊन उत्सव साजरा केला. यावर्षी प्रतिष्ठानने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त ज्ञानेश्वर सुवर्णयुग रथ मिरवणुकी आणला.
या रथ निर्मितीचे मार्गदर्शक बाळासाहेब भोसले यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे मंडळाचे अध्यक्ष अक्षय भोसले यांनी सांगितले.
धर्मराज ग्रुपने साडेतीन शक्ती पिठाचा अविष्कार आणि देवी भंडारा जागरण गोंधळ
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या पाठबळाने आळंदीचा गणेशोत्सव
पंचक्रोशीत दूर वर जावा यासाठी धर्मराज ग्रुप ने यावर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत तुळजापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुकामाता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी आणि वणीची आई सप्तशृंगी देवी असा साडेतीन शक्ती पिठाचा अविष्कार आणि देवी भंडारा जागरण गोंधळ असा अतिशय सुंदर जागर साकारण्याचा अट्टाहास धरून महाराष्ट्रा मधील साडेतीन शक्ती पीठ आळंदीत माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अलंकापुरीत अवतरीत करण्यात आले. या लक्षवेधी देखाव्याची दाद भाविक, नागरिकांनी दिली. दरवर्षी मंडळाच्या वतीने नवनवीन उपक्रम साकरले जातात. नवोपक्रम दरवर्षी सादर करण्याची परंपरा या वर्षीही धर्मराज ग्रॉऊंने कायम ठेवली.
श्री महाकाल महाआरती व बारा जोतिर्लिंग दर्शन
रौप्य महोत्सव वर्षा निमित्त जय गणेश ग्रुपने श्री महाकाल महाआरती व बारा जोतिर्लिंग दर्शन हा विसर्जन देखावा सादर केला. उज्जैन येथून आलेले वाद्य पथक, श्री शंकराचे वाहन असलेला नंदी, प्रमुख चौकात ब्रह्मवृंदांच्या हस्ते करण्यात आलेली महाआरती तसेच आकर्षक रथ हे या देखाव्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधवराव खांडेकर, आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे विश्वस्त पुरषोत्तम महाराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी उपाध्यक्ष जय गणेश ग्रुप अध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. ऍड नाजीम शेख यांनी संकल्पना मांडली. या सोहळ्यास देखावा निर्मिती एबी स्टुडिओ अक्षय भोसले यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, प्रियेश रानवडे, चेतन कुऱ्हाडे, संदीप कुलकर्णी, प्रभाकर थोरवे, अनिकेत कांबळे, प्रतीक लुणावत, युवराज वडगावकर, विनोद वाघमारे, अमित आंद्रे तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.