शाश्वत भविष्यासाठी एआयचा वापर करावा – अभिजित अटले
एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘एचएसडब्ल्यू टेक-२०२५ परिषदेचे’ उद्घाटन

पुणे, ३ सप्टेंबरः” हवामान अनुकरण, हवेची गुणवत्ता, त्याची देखरेख, अचूक शेती आणि ऊर्जा ऑप्टिमायझेशनमधील अनुप्रयोगद्वारा एआय हा शाश्वतेला पुढे नेत आहे .त्यामुळे या संधीचा लाभ घेतांना एआयच्या नैतिक आव्हानाबद्दल सावधगिरी बाळगावी. शाश्वत भविष्यासाठी एआय वापरासाठी नाविन्यपूर्ण परंतु जबाबदार मार्गांची कल्पना करणे गरजेचे आहे. तसेच डेटा संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे.” असे विचार आयबीएमचे लिड क्लाइंट पार्टनर अभिजित अटले यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग विभागाच्या वतीने ‘आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबिलिटी टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमिनिटी अॅण्ड स्मार्ट वर्ल्ड’ (एचएसडब्ल्यू टेक-२०२५) या विषयावर आयोजित तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. सुब्रा कांती दास, आईईआई पुणे विभागाचे सचिव डॉ. अभिजित खुरापे, ब्रॉडकॉचे वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक सुनील खराटे हे उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत काळे, अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एमआयटी डब्ल्यूपीयू आणि तांत्रिक कार्यक्रम समितीचे वरिष्ठ प्रा. डॉ. भरत चौधरी, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागाच्या कार्यक्रम संचालक डॉ. पारूल जाधव व प्रा. डॉ. सुनिल सोमाणी उपस्थित होत्या.
सुनील खराटे यांनी, तंत्रज्ञान आणि सोशल डिझाइनमधील नवीनतम प्रगतीवर एक आकर्षक विचार मांडले. सेमीकंडक्टर स्केलिंग कामगिरी, कार्यक्षमता आणि एकत्रीकरण कसे चालवते हे स्पष्ट केले. डिझाइन, पडताळणी आणि ऑप्टिमायझेशनमधील आव्हानांवर प्रकाश टाकला. आयओटी, ५जी, आरई सर्किट डिझाइनच्या वाढत्या भूमिकेवर भर देऊन चिप इनोव्हेशनला चालना देण्यात ब्रॉडकॉमच्या नेतृत्वाची भूमिका सामायिक केली. सेमीकंडक्अर डिझाइनमध्ये एआय आणि ऑटोमेशनचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगितले.
एलटीआय माइंडट्रीचे उपाध्यक्ष आणि जागतिक वितरण प्रमुख निखिल दातार यांनी ग्रीन एआय आणि तंत्रज्ञानाचे अध्यात्माशी एकत्रीकरण यावर भाष्य केले. नवोपक्रमाला चालना देताना ऊर्जेचा वापर आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर शाश्वत एआय पद्धतींच्या गरजेवर अधिक भर दिला.
डॉ. सुब्रा कांती दास यांनी भविष्य निर्मितीसाठी एआयचा वापर किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो यावर भाष्य केले. त्यांनतर डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. भरत काळे, डॉ. भरत चौधरी, डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी शाश्वत उपयांना दैनदिंन जीवनामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. अक्षय ऊर्जा प्रणाली, स्मार्ट ग्रिड, एआय चलित हवामान मॉडेलिंग, आयओटी आधारित अचूक शेती आणि हरित साहित्य ही पर्यावरणीय प्रणाली नाजूक राहिल्यास विज्ञान आणि इंजिनियरिंग कशी लवचिकता मजबूत करू शकते यावर भाष्य केले.
डॉ. पारुल जाधव यांनी प्रस्तावनेत परिषदेच्या माध्यमातून नवीन कल्पनांवर केवळ चर्चा केली जाणार नाही तर त्याला बळकटी देऊ. याचा उपयोग मानवतेसाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या आयईईच्या दृष्टिकोनात योगदान देऊ शकतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सुनिल सोमाणी यांनी केले.