येरवडा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

पुणे, दि.९: (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर पोलीस वाहतुक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वाहतूक शाखा कार्यालय, येरवडा येथे ‘राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
ही राष्ट्रीय लोक अदालत सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे, यामध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी वाहन चालकांवर इ-चलनाद्वारे दंड आकारण्यात आला आहे, अशा प्रलंबित चलन निर्गतीच्याअनुषंगाने तडजोड करुन सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.