डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथे जागतिक ईएनटी सर्जन्सचा SEOCON 25 चे भव्य आयोजन

परिषदेत आंतरराष्ट्रीय मान्यवर प्राध्यापकांचे व्याख्यान; विद्यार्थ्यांना व तरुण सर्जन्सना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण
- लाइव्ह सर्जरी, कॅडॅव्हरिक डिसेक्शन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव
- विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रेरणा देणारा शैक्षणिक व सांस्कृतिक उत्सव
पुणे, १८ सप्टेंबर २०२५ : सोसायटी ऑफ एंडोस्कोपिक ओटो-लॅरिंजॉलॉजिस्ट्स (SEO) ने SEOCON २५ या आंतरराष्ट्रीय परिषदेची घोषणा केली, ज्याने एंडोस्कोपिक कान, नाक व घसा (ईएनटी) शस्त्रक्रियेमधील मापदंड नव्याने निश्चित केले. चार दिवसीय शैक्षणिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथे करण्यात आले होते. या परिषदेने भारत व परदेशातील ३०० हून अधिक ईएनटी सर्जन्स, नाविन्यपूर्ण तज्ञ आणि संशोधकांना एकत्र आणले.
या SEOCON २५ मध्ये शैक्षणिक काटेकोरपणा आणि सांस्कृतिक एकोप्याचा सुंदर संगम साधण्यात आला. शास्त्रीय कार्यक्रमात जागतिक प्राध्यापक व मान्यवरांचे व्याख्यान झाले. यात इटलीचे प्रा. डॅनिएले मार्शिओनी, जर्मनीचे प्रा. रॉबर्ट म्लिन्स्की आणि भारताचे प्रा. सतीश जैन यांसारख्या ख्यातनाम तज्ञांनी सहभाग नोंदवला.
परिषदेबाबत बोलताना ओटो-राइनोलॅरिंजॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मयुर इंगळे म्हणाले की, “SEOCON २५ हा फक्त शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारा मंच नव्हता, तर उदयोन्मुख ईएनटी सर्जन्सच्या भविष्याला दिशा देणारी संधी होती. जागतिक तज्ञांशी संवाद साधून व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देऊन, पुढील पिढी उद्याच्या आरोग्य क्षेत्रातील आव्हानांसाठी सज्ज केली जात आहे.”
या तीन दिवस चाललेल्या परिषदेद एंडोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक ईएनटी प्रक्रियांमध्ये अत्याधुनिक लाईव्ह शस्त्रक्रिया आणि कॅडेव्हरिक डिसेक्शनद्वारे प्रत्यक्ष प्रदर्शनाचा फायदा प्रतिनिधींना झाला.
तसेच या परिषदेतील वैज्ञानिक परिसंवादांत टायम्पॅनोप्लास्टी, ऑसिक्युलोप्लास्टी, कोलेस्टेटोमा, स्टेप्स सर्जरी, कोक्लिअर इम्प्लांटेशन, व्हर्टिगो, अॅलर्जी, स्लीप सर्जरी, मेडिको-लीगल आव्हाने व ईएनटी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनावर चर्चा झाली. या सत्रांमधून प्रत्यक्ष क्लिनिकल प्रॅक्टिससाठी पुरावेआधारित माहिती पुरवली गेली, ज्यामुळे सर्जन्सना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची साधने मिळाली. या शैक्षणिक महत्त्वाची दखल घेत, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (MMC) मुख्य परिषदेसाठी 4 MMC क्रेडिट अवर्स मान्यता दिली. ओटो-राइनोलॅरिंजॉलॉजी विभागप्रमुख डॉ. मयुर इंगळे, ऑर्गनायझिंग चेअरमन डॉ. मुबारक एम. खान आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. सपना आर. परब यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद आयोजित झाली होती. या परिषदेने वैद्यकीय अचूकता आणि कल्पक नाविन्याचा सुंदर मेळ साधला.
परिषदेविषयी विचार मांडताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांचे कुलपती माननीय डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले, “डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथे आम्ही नेहमीच अशा शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन दिले आहे ज्यामुळे आरोग्यसेवेत उत्तम परिणाम साधले जातात. SEOCON २५ चे आयोजन केल्यामुळे शस्त्रक्रिया शिक्षण वृद्धिंगत करण्याचा व ईएनटी सेवांमधील नाविन्यपूर्ण संशोधनाला जागतिक स्तरावर चालना देण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे येथील प्र-कुलपती माननीय डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी नमूद केले, “SEOCON २५ ने सहकार्य आणि शोधभावनेचा आत्मा प्रतिबिंबित केला. जागतिक दर्जाचे प्राध्यापक आणि तरुण सर्जन्सना एकत्र आणून या परिषदेने परंपरा व नावीन्य तसेच ज्ञान व प्रत्यक्ष सराव यांच्यामधील पूल निर्माण केला.”डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांचे विश्वस्त व खजिनदार माननीय डॉ. यशराज पी. पाटील यांनी सांगितले “SEOCON २५ ने दाखवून दिले की आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन भारतातील शस्त्रक्रिया प्रशिक्षणाच्या पातळीला उंचावू शकतो. जागतिक तज्ञ आणि तरुण प्रतिभेला एकत्र आणून या परिषदेने ईएनटी शिक्षण व रुग्णसेवेत दीर्घकालीन प्रभाव निर्माण केला आहे.”
या परिषदेत आपले मत व्यक्त करताना डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांच्या अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कोट म्हणाल्या, “आयोजक संस्थेच्या नात्याने शल्यचिकित्सक आणि संशोधकांना अत्याधुनिक कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. SEOCON 25 ने केवळ ईएनटी प्रशिक्षणाची पातळी उंचावली नाही, तर विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांनाही प्रेरणा दिली.”



