राष्ट्रपिता म.गांधी व भारतरत्न लालबहाद्दू शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने एमआयटीत ‘स्मरण महामानवांचे’ अभिवादन सोहळा २ ऑक्टोबर रोजी

पुणे २९ सप्टेंबरः सत्य, अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक, महान शांतिदूत आणि मानवतेचे पूजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस
युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतिने ‘स्मरण महामानवांचे’ या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विजयादशमी गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कोथरुड येथील माईर्स
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे.
स्मरण महामानवांचे या अभिवादन सोहळ्याला ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी उर्वरित
महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार हे सन्माननीय अध्यक्ष असतील. या कार्यक्रमाला माईर्स
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा शुभाशीर्वाद असेल. तसेच माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.मंगेश तु. कराड, कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि.कराड आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.रविकुमार चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती असेल.
शांती, सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे, विश्वाच्रूा इतिहासातले एक महान शांतिदूत राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान हा नारा देणारे, देशात पडलेल्या भीषण दुष्काळात स्वतःचा अर्धाच पगार घेणारे साधीराणी, उच्च विचारसरणी व प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत प्रतीक भारतरत्न
लालबहाद्दूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन केले जाईल. तसेच आजच्यापिढीला या दोन महान महामानवाचे स्मरण करून त्यांच्या समोर यांच्या
व्यक्तिमत्वाची माहिती सांगितली जाणार आहे.
 
				 
					


