संजय लोणकर यांचे निधन

पिंपरी, पुणे : ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर आणि शरद लोणकर यांचे थोरले बंधू संजय निवृत्ती लोणकर (वय ६४ वर्षे) यांचे रविवारी (दि.५) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी, दोन मुले, नात असा परिवार आहे.
धनकवडी स्मशान भूमी येथे सकाळी त्यांच्या अंत्यविधी झाला.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे संजय लोणकर यांनी तत्कालीन अहमदनगर आणि आताचा अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेचे पहिले संपर्क प्रमुख म्हणून काम केले आहे. श्रीरामपूर तालुका जिल्हा व्हावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष पद भूषविले होते. ‘युक्रांद’ चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, स्वर्गीय माजी कामगार मंत्री शाबीर शेख यांच्या बरोबर त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.



