मराठी

कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती PMC प्रशासन झोपेत!

Spread the love

कात्रज दत्तनगर मुख्य रस्त्यावर जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सततच्या पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या वाल्वमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रस्ता कायम पाण्याखाली राहून मोठ्या प्रमाणात अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा रस्ता खोल चढ-उताराचा असल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक सातत्याने तक्रारी देत आहेत तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. पाणीपुरवठा विभाग व पथविभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत, आणि नागरिक मात्र दररोज संकटात सापडत आहेत.

राजकीय निष्क्रियता आणि विश्वासघात
मागील चार वर्षांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुका झालेल्याच नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी नसल्याने नागरिक पूर्णपणे बेसहारा झाले आहेत. माजी नगरसेवक गप्प बसले आहेत, तर या भागाचे आमदार व खासदार देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी फक्त राजकारणात व्यस्त आहेत. जनतेशी विश्वासघात करणारे हे आमदार-खासदार पुणेकरांच्या मूलभूत गरजांकडे पूर्णतः पाठ फिरवून बसले आहेत.

आम आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग आमच्याशी बोलताना प्रश्न उपस्थित केले. पाण्याची गळती तातडीने बंद करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत. जनतेशी विश्वासघात करणाऱ्या आमदार-खासदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ रस्ता मिळावा ही प्रशासनाची थेट जबाबदारी आहे. पाणीपुरवठा विभागाचा गळथान कारभार, पथविभागाची बेफिकिरी, स्थानिक प्रतिनिधींचा अभाव आणि विश्वासघात करणारे आमदार-खासदार या सगळ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टी नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल. सुनील कुमावत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!