पिंपरी चिंचवड़ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

मनिषाताई गोरे यांच्या झाझांवाद प्रचाराचा धुराळा चाकण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार

Spread the love

चाकण : प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे).चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची रणधुमाळी निवडक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई गोरे यांनी तसेच सर्व प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांनी प्रचाराचा धुराळा उडवीला आहे. प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन अडीअडचणी समजून घेऊन नगरपरिषदेच्या माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखा- जोखा आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्व.मा.आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरासाठी पाणी राखीव करणे, 160 कोटी रुपये नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करणे, जाचक मिळकत करवाढ रद्द करून नागरिकांना दिलासा, 7/12 वरील कालवा भू-संपदान शेरे कमी करणे. मुख्यमंत्री आरोग्य सहायता, लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत कार्ड शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवून लाभार्थी यांना प्रत्यक्ष मदत मिळवून दिली या सर्व काम त्याच प्रमाणे कोवीड काळातील आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था, परराज्यातील नागरिक यांना जाण्यासाठी बस सुविधा, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षलागवड, प्रदूषण मुक्त वातावरण निर्मिती साठी ऑक्सीजन वाढी प्रयत्न अशा विविध सामाजिक घटक यांचा सातत्याने कार्यक्रम सुरु आहे. नागरिक उस्फुर्त पणे शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मतदाराच्या मतदान रुपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चिचित असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!