धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

वेदांच्या अध्ययनाने समाजात बदल घडवून आणता येईल : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

Spread the love

पुणे,  वेदश्री तपोवनातर्फे आयोजित गीता जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज आणि लोकसभेचे सभापति ओम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय भुतडा या कार्यक्रमाचे यजमान आहेत.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गीता जयंती महोत्सवाचे यजमान आणि महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय भुतडा यांनी सभापति ओम बिर्ला यांचा पेशवाई पगड़ी आणि श्रीगणेश मूर्ति देऊन सत्कार केला.

लोकसभा सभापति ओम बिर्ला यांनी राजस्थान पत्रिका चे मुख्य संपादक गुलाबचंद कोठारी यांना महर्षि वेद व्यास पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी श्रीराम जन्मभूमि न्यास, अयोध्या चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरि महाराज देखिल उपस्थित होते.

 

या प्रसंगी बोलताना लोकसभा सभापति ओम बिर्ला म्हणाले, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी शंकराचार्य आणि गोविंद देव गिरि जी महाराज यांच्या सानिध्यात काही क्षण व्यतीत करू शकलो. स्वामी गोविंद गिरी महाराज आपल्या प्रतिष्ठान मार्फ़त आपला सनातन धर्म आणि वैदिक संस्कृतिचा प्रसार करत असुन देशभर प्रतिष्ठानद्वारा विविध पाठशाला चालवत अहेत. आजचा हा महोत्सव देखिल याचेच प्रतीक आहे. वेद आणि विद्येच्या माध्यमातुन समाज सुधारु शकतो आणि समाजात बदल घडवु शकतो. पुरस्कारार्थी गुलाब कोठारी यांनी वेदशास्त्र प्रसरणाचे कार्य अलौकिक आहे. पत्रकारितेबरोबरच आपली संस्कृति, वेद परंपरा यावर त्यानी खूप लेखन करून विविध पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे हे कार्य युवा पीढ़िला प्रेरणा देईल आणि सशक्त भारत निर्माणाला चालना येईल. पुरस्काराला योग्य व्यक्ति निवड़ल्याबद्दल वेदश्री प्रतिष्ठानचे देखिल मी अभिनंदन करतो.”

 

कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज म्हणाले, “आर्थिक विकासा बरोबर धार्मिक कार्य आणि सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे. वेदश्री प्रतिष्ठान मार्फ़त हे कार्य होत आहे. गीता जयंती महोत्सव हा त्यातिलच एक चांगला उपक्रम आहे. लोकसभा सभापति ओम बिरला हे आपल्या कामाद्वारे लोकशाहीच्या पवित्र मंदिराचे पवित्र्य राखण्याचे कार्य करत आहेत.”

यानंतर सायंकाळच्या कार्यक्रमात ह.भ.प. डॉ. मकरंदबुवा रामदासी यांच्या कीर्तनसेवेने दुसरया दिवसाची सांगता झाली.

आळंदी-मोशी येथील वेदश्री तपोवन येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत गीता जयंती महोत्सव सुरु असुन उद्या भव्य सांगता समारंभ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!