ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

एसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

Spread the love

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती, *एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे आणि मानसी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानार्थ प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजकार्य व महिला सशक्तीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवर महिलांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्ती म्हणून प्रा.  शीतल मोरे आणि  शुभदा गोडबोले यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या मानपत्राचे वाचन प्रज्ञा वझे आणि  स्मिता कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमात सीए सर्वेश मेहंदळे यांनी “स्त्रीचे मनोबल आणि सकारात्मकता” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नितिन शेलार यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत स्वसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थित विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृतीचे
प्रेसिडेंट रो. मोहन टिलू, सेक्रेटरी रो. स्मिता कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. संतोष परदेशी.
तसेच इतर सभासद उपस्थित होते. एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्सच्या वतीने प्राचार्य गणेश चव्हाण, प्रा. अनुजा किणीकर व इतर प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. मानसी फाऊंडेशनच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष सौ. मानसी ठाकूर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा भिसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे मनोबल वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!