ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

डिजिटल मिडिया परिषदेचा लवकरच राज्यव्यापी मेळावा होणार – एस. एम. देशमुख यांची कोल्हापुरात घोषणा 

Spread the love

कोल्हापूर ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार झाला असून उर्वरित जिल्ह्यात परिषद स्थापन होताच डिजिटल मिडियाचा एक राज्यव्यापी मेळावा पुणे किंवा संभाजीनगर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी काल येथे केली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक शाखा असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पत्रकारांचा मेळावा, आणि ओळखपत्र वितरण समारंभ काल कोल्हापुरात संपन्न झाला. मेळाव्यास दोन्ही जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सांगली आणि कोल्हापुरात डिजिटल मिडिया परिषदेचे काम जोरात सुरू आहे. एस.एम.देशमुख यांनी या कामाचा आढावा घेतला.. तसेच उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

डिजिटल मिडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जीआर मध्ये युट्यूब चँनल्स तसेच पोर्टलचा उल्लेख नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.. तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली.

डिजिटल मध्ये काम करणारया पत्रकारांना तांत्रिक गोष्टींची माहिती मिळावी यासाठी विभागवार कार्यशाळा घेण्याची परिषदेची योजना असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..

यावेळी उपस्थित पत्रकारांनी काही मौलिक सूचना केल्या.कार्यक्रमास विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, अधिस्विकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, पुणे विभागीय अध्यक्ष हरिष पाटणे, लातूर विभागीय अध्यक्ष विजय जोशी, कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर आदि उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष गणपत शिंदे यांनी प्रास्ताविक केले, अभिजित पटवा यांनी सूत्र संचालन केले, अनिल धुतमाळ यांनी मतं मांडली.. यावेळी उपस्थित पत्रकारांना ओळखपत्रांचे वाटप एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

https://youtu.be/xHi1Z36JVog?feature=shared

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!