कोटक म्यूचुअल फंड प्रस्तुत करत आहे छोटी SIP – तुमच्या स्वप्नांसाठी आयोजन करण्याचा एक छोटासा मार्ग

मुंबई, : कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“KMAMC” / ‘कोटक म्यूचुअल फंड”) ने आज “छोटी SIP” सुविधा लॉन्च केल्याचे जाहीर केले. छोटी SIP कोटक महिंद्रा म्यूचुअल फंड*च्या सर्व पात्र योजनांसाठी उपलब्ध असेल. SEBI आणि AMFI ने अलीकडेच छोटी SIP (स्मॉल टिकेट SIP) दाखल केली आहे, ज्यामधून संपत्ती निर्मितीच्या प्रवासात अधिकाधिक भारतीयांना आणण्याची एक उत्तम संधी सादर केली आहे.
KMAMCचे मॅनिजिंग डायरेक्टर श्री. निलेश शाह म्हणाले, “भारताच्या लोकसंख्येपैकी केवळ सुमारे 5.4 कोटी अनोखे गुंतवणूकदारच म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करतात- अशाप्रकारे, ही फारशी न वापरलेली आणि प्रचंड मोठी संधी आहे, जी अजूनही खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि भारतीय बचतकर्ते त्यातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करून त्यांचा म्यूचुअल फंड प्रवास सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. छोटी SIP च्या लॉन्चसह नवीन गुंतवणूकदार कमीत कमी 250 रुपयांनी आपला संपत्ती निर्मितीचा प्रवास सुरू करू शकतात. आपण त्याला ‘छोटी रकम – बडा काम’ असे म्हणू शकतो.”
या उपक्रमाच्या अंतर्गत नवीन गुंतवणूकदार 250 रुपयांच्या किमान रकमेसह SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. ‘छोटी SIP’ (स्मॉल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करण्यामागचा उद्देश प्रवेशातील अवरोध कमी करून, जास्तत जास्त लोकांसाठी, विशेषतः नवीन गुंतवणूकदारांसाठी म्यूचुअल फंड गुंतवणूक उपलब्ध करण्याचा आहे. गुंतवणूकदाराने आधी कधीही उद्योग स्तरावर म्यूचुअल फंड (SIP किंवा एकरकमी) मध्ये गुंतवणूक केलेली नसली पाहिजे. गुंतवणूकदाराने ग्रोथ ऑप्शनमध्येच गुंतवणूक केली पाहिजे आणि कमीत कमी 60 मासिक हप्ते भरण्यासाठी तो वचनबद्ध असला पाहिजे. हप्ते NACH किंवा UPI ऑटो-पे मार्फतच भरले पाहिजेत.
हा प्लॅन आपल्यासाठी अनुकूल आहे की नाही याबद्दल काही शंका असल्यास गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक तज्ज्ञाचा किंवा कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (KMAMC) कोणत्याही परताव्याची / भावी परताव्याची हमी देत नाही किंवा तसे वचन देत नाही.