अमोनोरा-फ्लेक्स्एनफ्लो करंडक’ स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे २५ मार्च पासून आयोजन
पुणे. पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटना (पीडीबीएसए) यांच्या मान्यतेनी आणि फ्लेक्स् एन फ्लो फिटनेस स्टुडिआ यांच्या तर्फे ‘अमोनोरा फ्लेक्स्एनफ्लो करंडक’ स्नुकर अजिंक्यपद निमंत्रित स्पर्धेचे २५ मार्च २०२५ पासून आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हडपसर येथील अमोनोरा फर्न क्लब येथे होणार असून स्पर्धेत एकूण १ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि पीडीबीएसएचे समर खंडेलवाल आणि फ्लेक्स् एन फ्लोचे फिटनेस स्टुडिओचे संचालक सचिन संचेती म्हणाल की, या १५-रेड स्नुकर स्पर्धेत पुण्यातील अव्वल आणि मानांकित असे निमंत्रित १६ खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक आणि ५० हजार रूपयांचे पारितोषिक मिळणार आहे. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना २८ मार्च २०२५ रोजी होणार आहे.
स्पर्धेत सोनु मातंग, अमरदीप घोडके, आरव संचेती, समर खंडेलवाल, साद सय्यद, विग्नेश संघवी, सुरज राठी, निमिश कुलकर्णी, तहा खान, हिसान सय्यद, गौरव देशमुख, रोहीत रावत, अभिषेक बोरा, कैवल्य जाधव, अभिजीत रानडे आणि पिनाक अनाप हे १६ खेळाडू सहभागी झाले आहेत.
चार खेळाडूंचा एक गट तयार करण्यात आला असून प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडू बाद फेरीसाठी पात्र होणार आहे. त्यानंतर उपांत्यपुर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होणार आहेत.