पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकास आराखड्यातील – वाहतूक दळणवळण झोन रद्द करण्याची मागणी

देहू. पुणे लोणावळा लोहमार्गाच्या दापोडी ते भेगडेवाडी रेल्वे हद्दी नंतर २५ मी वाहतुक दळवण हे शासनाच्या योजना पुस्तिकेत दर्शविण्यात आलेले असून सदर आरक्षण नाशिक – पुणे नियोजित लोहमार्गासाठी आहे असे उल्लेख केला असून त्यामध्ये दळणवळण जागा आरक्षित ठेवणे बाबत अद्याप निर्णय झालेला नाही असा उल्लेख करण्यात आला आहे.
रेल्वे विभागाकडे याबाबत माहिती मागितली असता त्यांच्या कडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. महानगरपालिका सुध्दा समाधान कारक उत्तर देत नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दापोडी ते किवळे रेल्वे हद्दी नंतर दळणवळण झोन साठी जागा उपलब्ध नाही, पिंपरी चिंचवड प्रारुप विकास योजनेतील नकाशात रावेत ते किवळे हद्दी पर्यंत वाहतूक दळणवळण झोन दर्शविला आहे या परिसरातील शेतकरी बांधवांच्या यापुर्वी काही जमिनी बी.आर.टी रस्त्यासाठी बाधित झालेल्या असून व उरलेले क्षेत्र वाहतूक दळणवळण झोन आरक्षणात दर्शविलेले असल्यामुळे शेतकरी भुमीहिन झाले आहे
तसेच किवळे हा परिसर महापालिकेत समाविष्ट होण्यापुर्वी रेल्वे हद्दी नंतर नागरिकांनी ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने बांधकामे केली आहेत. महापालिकेने रेल्वे हद्दी नंतर २० ते २५ फुट रस्त्याचे काम करून वृक्षारोपण केले आहे.
भविष्यात वाहतूक दळणवळण झोन रद्द न झाल्यास या भागातील २८५ बांधकामे बाधित होतील सदर आरक्षण रद्द करण्याची मागणी आहे. सन २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शाम भोसले यांनी समक्ष भेटून निवेदन दिले होते. या निवेदना नुसार अजित पवार यांनी आयुक्त यांना सदर आरक्षणा बाबत उचित कार्यवाही करण्या संदर्भात सुचना दिल्या होत्या. मात्र सुचने नुसार प्र.उपसंचालक नगररचना व विकास विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका या कार्यालयाने उपसंचालक नगररचना विकास योजना विशेष घटक व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांना सुचना या कार्यालयास दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सुचना देवून यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही. नुकतेच महानगरपालिका अतिक्रमण विभागाने रावेत मध्ये कार्यवाही केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किवळे – रावेत येथील अनावश्यक वाहतूक दळणवळण आरक्षण रद्द करण्याची मागणी असून आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात येथील स्थानिक नागरिक शाम भोसले यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. यावेळी आरक्षण रद्द करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले असल्याचे भासले यांनी सांगितले.