पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा
सांगवी एफसी, असोसिएशन पुना सोशल, टायगर्स कम्बाईन, बोपोडी एफसी, एफसी शिवनेरी, डायनामाईट्स एससी, साई फुटबॉल अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी
पुणे .पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम श्रेणी आणि व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यात सांगवी एफसी, असोसिएशन पुना सोशल, टायगर्स कम्बाईन, बोपोडी एफसी, एफसी शिवनेरी, डायनामाईट्स एससी आणि साई फुटबॉल अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या प्रथम श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये सांगवी फुटबॉल क्लब असोसिएशनने पीसीएच स्पोटर्स क्लबचा ४-१ असा पराभव केला. विजयी संघाकडून नईम सय्यद याने दोन गोल तर, आकाश मंडल आणि श्रीराज नायर यांनी एकेक गोल केले. दुसर्या सामन्यामध्ये असोसिएशन पुना सोशल अ संघाने ब्ल्यु स्टॅग स्पोटर्स अॅकॅडमीचा ३-१ असा पराभव केला. सामन्यामध्ये डॅलियन ल्युथर, समेल हंसदा आणि मॅकरूवुंग झिमिक यांनी प्रत्येकी एकेक गोल नोंदविला. ब्ल्यु स्टॅग स्पोटर्स अॅकॅडमीकडून अथर्व मिरकर याने एक गोल केला. सर्वेश देशपांडे याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर टायगर्स कम्बाईन एफसी संघाने व्हॅली हंटर्सचा ४-१ असा पराभव केला.
व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यामध्ये बोपोडी एफसी संघाने युनिटी पुना स्पोटर्स अॅकॅडमीचा ४-१ असा पराभव केला. बोपोडीकडून रोहन सुनर याने दोन गोल तर, ऋषीकेश पाखरे आणि निखील मोरे यांनी एकेक गोल केला. झिशान शेख याच्या दोन आणि दिपक शर्माने केलेल्या एक गोलाच्या जोरावर एफसी शिवनेरी संघाने एफसी जोसेफ संघाचा ३-० असा सहज पराभव केला. अभिकेत भरसकाळे, रितेश पवार आणि रोहन भादंगे यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर डायनामाईट्स एससी संघाने इंद्रायणी एससी ब संघाचा ३-१ असा पराभव केला. यश भाटीया आणि शुभम गिरी यांनी केलेल्या गोलपूर्ण कामगिरीमुळे साई फुटबॉल अॅकॅडमीने मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमीचा २-० असा पराभव करून आगेकूच केली.
सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः प्रथम श्रेणी गटः
१) सांगवी फुटबॉल क्लब असोसिएशनः ४ (आकाश मंडल १८ मि., नईम सय्यद २२, ७३ मि., श्रीराज नायर २८ मि.) वि.वि. पीसीएच स्पोटर्स क्लबः १ (केविन फ्रान्सीस १४); पुर्वार्धः ३-१;
२) असोसिएशन पुना सोशल अः ३ (डॅलियन ल्युथर ४ मि., समेल हंसदा ३९ मि., मॅकरूवुंग झिमिक ४५ मि., ) वि.वि. ब्ल्यु स्टॅग स्पोटर्स अॅकॅडमीः १ (अथर्व मिरकर ६१ मि.); पुर्वार्धः ३-०;
३) टायगर्स कम्बाईन एफसीः ४ (सर्वेश देशपांडे ४६, ५७, ८२ मि., विरेंद्रसिंह राजपुरोहीत ८८ मि.) वि.वि. व्हॅली हंटर्सः १ (ओंकार निपसे १६ मि.); पुर्वार्धः ०-१;
व्दितीय श्रेणी गटः
१) बोपोडी एफसीः ४ (ऋषीकेश पाखरे १३ मि., रोहन सुनर ४६, ८२ मि., निखील मोरे ९०+१ मि.) वि.वि. युनिटी पुना स्पोटर्स अॅकॅडमीः ०; पुर्वार्धः १-०;
२) एफसी शिवनेरीः ३ (दिपक शर्मा २७ मि., झिशान शेख ५८, ६० मि.) वि.वि. एफसी जोसेफः ०; पुर्वार्धः १-०;
३) डायनामाईट्स एससीः ३ (अभिकेत भरसकाळे ५७ मि., रितेश पवार ६६ मि., रोहन भादंगे ६८ मि.) वि.वि. इंद्रायणी एससी बः १ (निखील मोटे २८ मि.); पुर्वार्धः ०-१;
४) साई फुटबॉल अॅकॅडमीः २ (यश भाटीया १८ मि., शुभम गिरी ४७ मि.) वि.वि. मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमीः ०; पुर्वार्धः १-०;