कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार – ज्योती सावर्डेकर
भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पदी ज्योती सावर्डेकर यांची निवड

राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत पद नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न
पुणे . मागील 25 वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांवर काम करत आहे. बांधकाम व्यावसाय, असंघटित कामगार यांच्यामध्ये सुरक्षा आणि आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत, कामगारांच्या मुलांचे शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, यामुळे कामगारांचे हित जोपासत त्यांच्या कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचा संकल्प भारतीय जनता मजदूर सेलच्या नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन विष्णुप्रिय रॉय चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष अर्नब चॅटर्जी, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, महिला सेलच्या अध्यक्ष सविता पांडे, जयेश टांक,उमेश शहा आदि मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती सावर्डेकर यांचा पद नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला, यावेळी सावर्डेकर बोलत होत्या.
विष्णुप्रिय रॉय चौधरी म्हणाले, भारतीय जनता मजदूर सेल दीनदयाळ उपाध्याय, श्यामप्रसाद मुखर्जी यांनी घालून दिलेल्या आदर्शाने काम करत आहे. शेवटच्या माणसाचे हित लक्षात घेऊन आम्ही सदैव काम करत आलो आहोत. आज महाराष्ट्र अध्यक्ष झालेल्या ज्योती सावर्डेकर या मागील अनेक वर्षे उत्तम काम करत आहेत, आता त्यांना पद मिळाले आहे, त्या पदला साजेसे काम त्यांच्याकडून होणार यात शंका नाही.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या साठे आणि मृदुला महाजन यांनी केले.