ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

एक आदर्श ‘झेप’ : WDDD उद्या 10 डिसेंबरला जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनाचे (WDDD) आयोजन 

Spread the love

पुणे : प्रतिनिधी डिजिटल उपकरणांच्या अतिरेकामुळे तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा जोडण्यासाठी, मुलांचे हरवत चाललेले बालपण वाचवण्यासाठी आणि समाजाला या डिजिटल गोंधळातून बाहेर काढण्यासाठी जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन (WDDD) ही मोहीम सुरू आहे. World Digital Detox Day (WDDD) हा एक नॉन-प्रॉफिट, जगातील सर्वात मोठा डिजिटल वेलनेस मूव्हमेंट आहे. तब्बल 80 देशांमध्ये WDDD प्रतिज्ञा आणि विविध उपक्रमांनी वेलनेस लीडरशिपद्वारे आयोजित केले जात आहेत. या सर्वांचा जागतिक स्तरावर उत्सव उद्या 10 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. याला महाराष्ट्र शासन आणि मध्यप्रदेश शासनाने अधिकृत पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे या मिशनला अधिक व्यापक आणि राष्ट्रीय बळ मिळाले असल्याची माहिती World Digital Detox Day (WDDD) च्या संस्थापिका डॉ. रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतातील सर्व राज्यांमध्ये, तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे येथे जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. विद्यार्थी WDDD प्रतिज्ञा घेऊन यात सहभागी होतील, असे ZEP Foundation च्या अध्यक्षा डॉ. रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी Swan Foundation चे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि प्रसाद भोपळे उपस्थित होते.

याबाबाद अधिक माहिती देताना डॉ. रेखा चौधरी म्हणाल्या, WDDD ही चळवळ केवळ जनजागृती नाही – ही मानवतेला वाचवण्यासाठीची जागतिक जबाबदारी आहे. ही नियमितपणे साजरी होणारी एखादी औपचारिक तारीख नाही. मोबाईल, सोशल मीडिया, कॉम्प्युटर, आयपॅड यांसारख्या गॅजेट्सच्या अतिवापरामुळे माणसांचा जगाशी तुटलेला संपर्क आणि त्यामुळे निर्माण होणारे असंतुलन दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. WDDD चा भाग म्हणून पुण्यात उद्या 10 डिसेंबर रोजी शनिवार वाडा ते शनीपार चौक या मार्गावर सकाळी 8.30 वाजता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त योगेश जवादे, सिंहगड फाऊंडेशन, अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट, आणि हरीभाई देसाई कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

शशिकांत कांबळे म्हणाले की, डॉ. रेखा चौधरी यांचा हा उपक्रम नवसंजीवनी देणारा असून या चळवळीला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. 80 पेक्षा अधिक देशांतील मान्यवर आता WDDD च्या दूत म्हणून कार्यरत आहेत. जागतिक मानसिक आरोग्यासाठी ऐक्य निर्माण व्हावे या उद्देशाने ZEP Foundation आणि Swan Foundation संयुक्तपणे ही चळवळ 80 देशांमध्ये पोहोचवत आहेत.

पुढील वर्षी 26 जानेवारी 2026 पासून 80 देशांमध्ये 10 सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ WDDD दूतांसोबत भेटी देतील. या दौऱ्यात जागतिक संस्था, असोसिएशन्स, सरकारी विभाग, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये जागरूकता अभियान राबवले जाईल. WDDD चे 1111 Digital Fasting Formula, ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्ये जनजागृतीसाठी काश्मीर ते कन्याकुमारी अशी 10500 किमीची रॅली आयोजित करण्यात आली आहे. यात भारतातील 20 राज्यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्यातील राजभवन, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांना भेटी दिल्या जातील.

विशेष आभार
* जय गणेश व्यासपीठ, पुणे ( पियुष शहा)
* सिंहगड परिवार फौंडेशन, पुणे ( प्रकाश केदारी व आबा)
* अनुराग चारिटेबल ट्रस्ट, पुणे (सुनीता काटम)
* हरी भाई देसाई आर्टस्, कॉमर्स आणि सायंस कॉलेज, पुणे ( मुख्याध्यापक गुरव सर)
* विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील मनपा व खाजगी शाळातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत
* दगडू शेठ हलवाई गणपती ट्रस्ट (अध्यक्ष सुनील भाऊ रासने )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!