खेलपुणे

‘युथ करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा

एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा बाद फेरीत प्रवेश !!

Spread the love
पुणे . निकीत मलके स्पोटर्स मॅनेजमेंट आणि पुणे क्रिकेट क्लब यांच्यावतीने ‘युथ करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब (३०-३० षटकांच्या) क्रिकेट स्पर्धेत एसएआरके क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने गेम ऑन अ‍ॅकॅडमी आणि क्रिकप्लस अ‍ॅकॅडमी या संघांचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.

वाघोली येथील पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत जान्हवी गायकवाड हिने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे एसएआरके संघाने गेम ऑन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा २१ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसएआरके अ‍ॅकॅडमीने १४२ धावांचे लक्ष्य उभे केले. दर्शसिंग राजपुत (३७ धावा), जान्हवी गायकवाड (२० धावा) आणि प्रथमेश पाटील (१४ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. या आव्हानाचा पाठलाग करताना गेम ऑन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १२१ धावांवर मर्यादित राहीला. शरण्य धुमाळ याने एकहाती लढत देताना नाबाद ५२ धावांची खेळी केली. अन्श तरल याने ३ गडी आणि सृष्टी भुजबळ हिने २ गडी बाद करून संघाचा विजय निश्चित केला.

दुसर्‍या सामन्यामध्ये जान्हवी गायकवाड हिने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे एसएआरके अ‍ॅकॅडमीने क्रिकप्लस अ‍ॅकॅडमीचा ३ धावांनी निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा खेळणार्‍या एसएआरके अ‍ॅकॅडमीने ३० षटकामध्ये १३२ धावांचे आव्हान निर्माण केले. जान्हवी गायकवाड हिने ५५ चेंडूत ७ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. अथर्व समर्थ याने २४ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकप्लस अ‍ॅकॅडमीचा डाव १२९ धावांवर मर्यादित राहीला. ओम झाकणे याने ४८ धावांची तर, प्रगल्भराज सिंग याने नाबाद ३२ धावांची खेळी केली. जान्हवी गायकवाड हिने १६ धावांमध्ये २ गडी बाद करून संघाचा विजय निश्चित केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसएआरके अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ८ गडी बाद १४२ धावा (दर्शसिंग राजपुत ३७, जान्हवी गायकवाड २०, प्रथमेश पाटील १४, नईशा शर्मा २-१४, अर्षदीप सिंग २-१३) वि.वि. गेम ऑन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २८.३ षटकात १० गडी बाद १२१ धावा (शरण्य धुमाळ नाबाद ५२ (७२, ६ चौकार), अभिनव मुंढे १५, अन्श तरल ३-२९, सृष्टी भुजबळ २-१८, जान्हवी गायकवाड १-१५); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः जान्हवी गायकवाड;

एसएआरके अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ७ गडी बाद १३२ धावा (जान्हवी गायकवाड ४० (५५, ७ चौकार), अथर्व समर्थ २४, स्वरूप यादव २-२०) वि.वि. क्रिकप्लस अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ५ गडी बाद १२९ धावा (ओम झाकणे ४८ (५७, ६ चौकार), प्रगल्भराज सिंग नाबाद ३२, जान्हवी गायकवाड २-१६); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः जान्हवी गायकवाड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button