
खराडी येथील टॉपप्ले फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यामध्ये संजय थापा याने केलेल्या गोलामुळे पुना सोशल एससी संघाने एफसी जोसेफ संघाचा १-० असा पराभव केला. यश कोद्रे याने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या मदतीने बोपोडी एफसी संघाने स्पोर्ट्स मेनिया संघावर १-० असा विजय मिळवला.
प्रथम श्रेणी गटाच्या सामन्यामध्ये जाएंट्स एफसीने रूपाली क्लबचा ३-२ असा निसटता पराभव केला. जाएंट्स एफसी संघाकडून सागर पुजारी, विजय कालेल आणि जादाच्या वेळेत निर्णायक क्षणी दुर्वेश जगताप यांनी गोल केला. रूपाली एससीकडून अनुराग पवार आणि संग्राम सातव यांनी गोल नोंदविले. अनिकेत भडके याने केलेल्या गोलामुळे पुणे शहर पोलिस संघाने डेक्कन इलेव्हन ब संघाचा १-० असा पराभव केला. रेंजहिल्स् यंग बॉईज संघाने एकतर्फी विजय नोंदविताना राम स्पोर्टींग अ संघाचा ७-१ असा पराभव केला. रेंजहिल्स्कडून मनिष ठाकरे याने तीन गोल तर, आशिष तावरे, अनिरूध्द नायर आणि अमृत भडाळे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः व्दितीय श्रेणी गटः
१) पुना सोशल एससीः १ (संजय थापा ५८ मि.) वि.वि. एफसी जोसेफः ०; पुर्वार्धः ०-०;
२) बोपोडी एफसीः १ (यश कोद्रे ६५ मि.) वि.वि. स्पोर्ट्स मेनियाः ०; पुर्वार्धः ०-०;
प्रथम श्रेणी गटः
१) जाएंट्स एफसीः ३ (सागर पुजारी ४८ मि., विजय कालेल ५९ मि., दुर्वेश जगताप ९०+४ मि.) वि.वि. रूपाली एससीः २ (अनुराग पवार ५२ मि., संग्राम सातव ५८ मि.); पुर्वार्धः ०-०;
२) पुणे शहर पोलिसः १ (अनिकेत भडके २८ मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हन बः ०; पुर्वार्धः १-०;
३) रेंजहिल्स् यंग बॉईजः ७ (मनिष ठाकरे २१, ३३, ३८ मि., आशिष तावरे २३ मि., अनिरूध्द नायर २५ मि., अमृत भडाळे ३६ मि., समीर जोशी (स्वयंगोल ३७ मि.) वि.वि. राम स्पोर्टींग अः १ (तेजस जगताप २२ मि.); पुर्वार्धः ७-१;