पुणेब्रेकिंग न्यूज़मराठी
बारावी परीक्षेत सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम निकाल, गुणवत्तेची परंपरा कायम – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम , प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थी, पालकांचे, तसेच समूह प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांडे, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत पवनी शार्दूल भिडे (९२.५० टक्के), संयुक्ता अशोक मोरे (९२.३३ टक्के), चिन्मयी ज्ञानेश रहाणे (९२ टक्के), शौनक विजय तिकोटेकर व आर्या सुनील बोर्डे (९१.८३ टक्के), शर्वरी योगेश महाबळेश्वरकर, रेवा सुनील करंदीकर व निषाद नैनीश लुब्री (९१.६७ टक्के) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत विनीत महेश बंग (९१ टक्के), प्रसाद काशवी (९० टक्के), श्रीम गिरीश पसाद (८५.१७ टक्के), मीनाक्षी राहुल मालेगावकर (८०.३३ टक्के), तर श्रीनिवास पांडुरंग दगडे (७९.६७ टक्के) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. कला शाखेत झलक दर्शन गांधीने (९०.५० टक्के) पहिला, शुभश्री विश्वनाथने (८९.८३ टक्के) द्वितीय, शर्वरी मंदार दामलेने (८७.१७ टक्के) तृतीय, जान्हवी अजयकुमार (८६.६३ टक्के) हिने चौथे, तर निखिल संतोष खळदकर (८५.५० टक्के) याने पाचवे स्थान पटकविले.