बीएनसी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने एकाच कामाच्या दोन वर्क ऑर्डर काढून दोन कोटी सहा लाख ९४ हजारांची फसवणूक

पुणे. बीएनसी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने एकाच कामाच्या दोन वर्क ऑर्डर काढून दोन कोटी सहा लाख ९४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात निखिल ओमप्रकाश राय (वय २८, रा. रांजणगाव एमआयडीसी, पुणे) यांनी आरोपी राजेश प्रकाश चौधरी, गिरीश भागवत चौधरी, यशोधन नामदेव चौधरी, नानासाहेब मारुती निकम, जितेंद्र गरुड, निलेश मतकर, मयुर साखरे व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पोलीस बीएनसी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास करेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे
भोसरीतील उपकेंद्रातून यशवंत नगर चौक दरम्यान 220 केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे कामाचा ठेका एका मोठ्या कंपनीकडून बीएनसी पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने मिळवला. हे काम पूर्ण करण्यासाठी शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडशी करार करुन त्यांच्या लायसन्सचा वापर करून काम सुरू केले. दरम्यान बीएनसी पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला तुमच्या कामात मयुर साखरे यांना सिव्हिल काम द्या यासाठी दबाव आणला. त्यांना या कामात भागीदार करण्यासाठी सांगितले. काम पुढे गेल्यामुळे मजबुरीत शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडने मयूर साखरेला सोबत घेतले.
भोसरीतील उपकेंद्रातून यशवंत नगर चौक दरम्यान 220 केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम पूर्ण होत असताना बीएनसी पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड नोटीस पाठवून काम थांबायला सांगितले व याच कामाचे सीताई इंटरप्राईजेसचे मयूर साखरे यांना परचेस ऑर्डर दिली. बीएनसी पावर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने एकच कामाचे दोन कंपन्यांना परचेस ऑर्डर दिल्या.
शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडची 2 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम फसवणूक केली. या प्रकरणात शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांना तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड निखिल राय यांनी आरोपी राजेश प्रकाश चौधरी, गिरीश भागवत चौधरी यशोधन नामदेव चौधरी नामदेव मारुती निकम जितेंद्र गरुड निलेश मतकर आणि सीताई इंटरप्राईजेसचे मयूर साखरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.