ब्रेकिंग न्यूज़मराठी
श्रीराम फायनान्स लिमिटेडतर्फे २ मे २०२५ पासून मुदत ठेवींच्या व्याजदरात सुधारणा केली आहे
• वरिष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्ष ०.५० टक्के* अतिरिक्त व्याजदर दिला जाणार. • महिला ठेव गुंतवणूकदारांना प्रतिवर्ष ०.१० टक्के* अतिरिक्त व्याजदर दिला जाणार.
पुणे . श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेड (एसएफएल) आपल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात बदल करत असल्याची घोषणा केली आहे विविध मुदतींच्या मुदत ठेवींसाठी असलेले व्याजदर कंपनीने बदलले आहेत. व्याजदरात करण्यात आलेले हे बदल येत्या २ मे 2025 पासून लागू होणार आहेत
बदल करण्यात आलेले दर पुढीलप्रमाणे आहेतः
नवीन ठेवींवरील व्याजदर/ नूतनीकरण
दहा कोटी रुपयांपर्यंत ( २ मे २०२५ पासून प्रभावीपणे अंमलबजावणी) *
बिगर संचित ठेवीसंचित ठेवी
मुदत (महिने) मासिक % प्रतिवर्ष त्रैमासिक % प्रतिवर्ष अर्धवार्षिक % प्रतिवर्ष वार्षिक % प्रतिवर्ष दर % (मासिक कालावधीनुसार प्रतिवर्ष) प्रभावी उत्पन्नदर
% प्रतिवर्ष परिपक्वता मूल्य रु. ५,०००/-
12 7.39 7.44 7.51 7.65 7.39 7.65 5,382
15 (डिजीटल स्वरुपात) 7.63 7.68 7.75 7.90 7.63 7.98 5,498
18 7.53 7.58 7.65 7.80 7.53 7.95 5,595
24 7.63 7.68 7.75 7.90 7.63 8.21 5,821
36 8.09 8.15 8.23 8.40 8.09 9.12 6,368
50 8.09 8.15 8.23 8.40 8.09 9.58 6,996
60 8.09 8.15 8.23 8.40 8.09 9.93 7,482
साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव करताना अथवा आधीच्या ठेवीचे नुतनीकरण करताना प्रति वर्ष 0.50% अतिरिक्त व्याजदराचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदार महिलांनासुध्दा प्रतिवर्षी 0.10% अतिरिक्त व्याजदराचा लाभ दिला जाणार आहे. सर्व ठेवींच्या फेरनुतनीकरणासाठी एसएफएल अतिरिक्त 0.25% वार्षिक व्याजदराचा लाभ देणार आहे. एसएफएलच्या मुदत ठेवींना इक्रा एए प्लस (स्थिर) हा दर्जा इक्राने बहाल केलेला आहे, तर इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने आयएनडी एए +/स्टेबल हा दर्जा बहाल केलेला आहे. कंपनी किमान पाच हजार रुपये रक्कम आणि त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत मुदत ठेवींसाठी गुंतवणूक स्वीकारणार आहे.