
आळंदी / प्रतिनिधी : येथील प्रसिद्ध युवा उद्योजक शिवसेना आळंदी उपशहर प्रमुख मदन विठ्ठल घुंडरे पाटील ( वय ३९ वर्षे ) यांचे गुरुवारी ( दि. ८ ) निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, मुलगा, तीन भाऊ आई, वडील, असा परिवार आहे. आळंदीतील सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील कार्यात नेहमी सहभाग होता. कापड उद्योजक मुरलीधर घुंडरे, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील घटक प्रा. श्रीधर घुंडरे पाटील यांचे ते लहान बंधू होत. शोकाकुल वातावरणात आळंदीत त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.