ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

प्रवासी वाहनांच्या विस्तारासाठी मॅग्मा जनरल इन्शुरन्सची टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडियासोबत भागीदारी

Spread the love

Pune. भारतात जनरल विमा क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेड (मॅग्मा) (पूर्वीची मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) ने जपानच्या टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (टीटीआयबीआय) या कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. प्रवासी कार विमा विभागात आपला विस्तार करण्याच्या दिशेने कंपनीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

उभय कंपन्यांच्या या भागीदारीत टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशभरातील आपल्या १५० डीलर नेटवर्क मधुन खासगी आणि व्यावसायिक प्रवासी वाहनांसाठी मॅग्माच्या व्यापक मोटार विमा योजनांचे वितरण करणार आहे. मॅग्मातर्फे मोटार विमा योजनांतर्गत देण्यात येणारे अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्तीसाठी दिले जाणारे विमा कवच तसेच तृतीय-पक्ष्याच्या दायित्वांसाठी असलेले विमा कवच हे नानाविध पर्याय ग्राहकांपर्यंत अधिक सुलभ पध्दतीने पोहचविणे आणि ते कार्यक्षम बनवणे, हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री राजीव कुमारस्वामी याप्रसंगी म्हणाले: “टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडियासोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही भागीदारी म्हणजे प्रवासी कार विभागात, विशेषतः खासगी कारमध्ये आमचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी उचलेले एक धोरणात्मक पाऊल आहे. प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि विश्वास या आमच्या सामायिक मूल्यांसह ही भागीदारी आमच्या ग्राहकांना एक अत्युत्तम सेवा अनुभव देण्यास सक्षम करेल, हा आम्हाला विश्वास आहे.”

मॅग्माबरोबरील या भागीदारीबद्दल आपले विचार मांडताना टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. ताकायुकी उएदा सॅन म्हणाले, “मॅग्मासारख्या विश्वासार्ह भागीदारासोबतच्या या सहकार्यातून भरवशाचे आणि उच्च-गुणवत्तेचे विमा पर्याय आम्ही ग्राहकांना देणार आहे आणि देशात विम्याची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या भागीदारीमुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट विमा योजना आणि उच्च दर्जाचा अनुभव प्रदान करणे शक्य होणार आहे.”

मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या ग्राहक-केंद्रित वृध्दी आणि बाजारपेठ विस्ताराच्या वचनबद्धतेला हे सहकार्य पाठबळ प्रदान करते. टीटीआयबीआय सोबतच्या या भागीदारीतून कंपनीने भारतभर दर्जेदार मोटार विम्याची उपलब्धता अधिकाधिक सोपी आणि सुटसुटीत करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button