पुणेब्रेकिंग न्यूज़मराठी

ज्ञानदेव पडळकर महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी रूजू

Spread the love

पुणे. महावितरणच्या रास्तापेठ शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते नाशिक मंडलमध्ये याच पदावर कार्यरत होते. रास्तापेठ मंडलचे यापूर्वीचे अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले यांची पदोन्नतीवर मुख्य अभियंतापदी लातूर येथे बदली झा  ली. त्यांच्या रिक्त जागी श्री. पडळकर रूजू झाले आहे.

तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये श्री. ज्ञानदेव पडळकर ऑगस्ट १९९७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. पदोन्नतीनंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता म्हणून जत, सांगली, कोल्हापूर तर कार्यकारी अभियंता म्हणून पुणे (कोथरूड विभाग) येथे काम केले आहे. जानेवारी २०१७ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे श्री. पडळकर यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर सोलापूर व नाशिक येथे काम केल्यानंतर बदलीद्वारे पुणे येथील रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून ते रूजू झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!