ताजा खबरब्रेकिंग न्यूज़मराठी

तीर्थक्षेत्र आळंदीचे विकासास उमेदवारांचे मतदारांना निवडून देण्याचे आवाहन 

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मैत्रीपूर्ण लढती 

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, भारतीय जनता पार्टीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, अपक्ष दोन उमेदवारांत सुरेश दौण्डकर, उमेश डरपे यांच्यात लढत होत आहे. आळंदी मध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक ते दहा प्रभागातून २१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या साठी आळंदीतून विविध राजकीय पक्ष यात महाविकास आघाडी, महायुती तसेच अपक्ष मित्र पक्ष मैत्रीपूर्ण लढती देखील होत आहेत. बहुतेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार एकमेकांसमोर लढत असून महाविकास आघाडीचे माध्यमातून काही ठिकाणी उमेदवार देण्यात आल्याने चुरस वाढली आहे. यात काही ठिकाणी अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीचे प्रचार दरम्यात रंगत वाढविली आहे. २ डिसेम्बर रोजी मतदान आणि ३ डिसेम्बर रोजी मत मोजणी होणार आहे. आळंदीतील सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराने जोर पकडला असून अंतिम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीज तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही जाहीर सभा होत आहेत. रॅली, कोपरा सभा, घरभेटीतून उमेदवारांनी प्रचार केला असून एक दिवस वाढून मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित वेळेत मतदारांचे पर्यंत पोहोचण्यासाठी अजून हि उमेदवारांची लगबग सुरूच आहे. आळंदीच्या विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन बहुतेक उमेदवार यांनी मतदारांना केले आहे.

प्रमुख लक्षवेधी लढतीत आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक एक अ मध्ये शिवसेने तर्फे ऋतुजा घुंडरे आणि भाजप तर्फे ज्योती घुंडरे यांच्यात लक्षवेधी चुरशीची लढत होत आहे. प्रभाग क्रमांक एक ब मध्ये शिवसेने तर्फे माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे आणि भाजप तर्फे सचिन घुंडरे यांच्यात लक्षवेधी चुरशीची लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये लक्षवेधी लढत होत आहे. येथे भाजपच्या माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे समवेत शिवसेनेच्या अनुपमा नेटके, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या तर्फे सोनू नेटके, अपक्ष उमेदवार योगिता नेटके यांचे मध्ये आळंदीतील मुख्य लक्षवेधी लढत होत आहे. संपूर्ण आळंदी पंचक्रोशीतील जनतेचे या लढतीचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष भाजपचे रामचंद्र भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सागर भोसले यांच्यात मोठी लक्षवेधी लढत होत आहे. दोन चुलत भावांमध्ये ही लक्षवेधी लढत असल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विजय श्री कोण खेचून आणणार याची उत्सुकता जनतेत आहे.

प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा गोगावले, भाजपच्या पूजा घुंडरे यांचे मध्ये सरळ दुरंगी सामना होत आहे. प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेंद्र कुऱ्हाडे, भाजप तर्फे सोमनाथ कुऱ्हाडे यांचे मध्ये सरळ दुरंगी लक्षवेधी सामना होत आहे.

प्रभाग क्रमांक चार अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पूजा कुऱ्हाडे, शिवसेने तर्फे हिरकणी दुर्वे, भाजपा तर्फे कांचन येळवंडे यांचे तिरंगी सामना रंगला आहे. प्रभाग क्रमांक चार ब मध्ये अपक्ष सुजित काशीद, राष्ट्रवादी तर्फे योगेश कुऱ्हाडे, भाजपा तर्फे सागर कुऱ्हाडे यांचे मध्ये तिरंगी लक्षवेधी लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रोहन कुऱ्हाडे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने संतोष रासकर यांच्या मध्ये लक्षवेधी सरळ लढत होत आहे. प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कांचन कुऱ्हाडे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने खुशी बिरुंदीया यांच्या मध्ये लक्षवेधी सरळ लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये भाजपच्या साक्षी कुऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लतिका वाघमारे यांच्यात दुरंगी सामना होत आहे. प्रभाग क्रमांक सहा ब राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष कारेकर, भारतीय जनता पार्टीचे हेमंत उर्फ सागर कुऱ्हाडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे रवींद्र रंधवे, अपक्ष प्रसाद बोराटे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक सात अ मध्ये शिवसेनेच्या वतीने अरुणा घुंडरे आणि भाजप तर्फे माजी नगरसेविका ज्योतीताई चिताळकर पाटील यांच्या मध्ये चुरशीची लक्षवेधी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शिवसेने तर्फे ज्ञानेश्वर गुळुंजकर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुनील घुंडरे यांच्यात सरळ लक्षवेधी सामना होत आहे.

प्रभाग क्रमांक आठ अ अपक्ष उमेदवार भागवत आवटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामप्रसाद कवडे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष सचिन गिलबिले यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये देखील महायुतीतच सामना रंगला आहे. यात अमोल केकाण, माजी नगरसेवक दिनेश घुले, गटनेते पांडुरंग वहिले हे लढत देत आहेत. आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ ब मध्ये सुनंदा चांदगुडे, अर्चना तापकीर, अलका बवले यांच्या मध्ये लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांनी उमेदवार दिले आहेत.

प्रभाग क्रमांक १० अ मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसच्या माध्यमातूनही प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये ॲड प्रियेश सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष सोनवणे, शिवसेनेचे सुरेश नाना झोंबाडे, भाजपच्या वतीने ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ज्ञानेश्वर वाघमारे, सुहास दुनघव अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ठीक ठिकाणी मैत्री पूर्ण देखील लढत होत आहे. प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये आशा गडदे, संगीता चव्हाण, माजी नगरसेविका माधवी चोरडिया, आरती तापकीर आणि ऋतुजा तापकीर यांच्या लढत होत आहे. प्रभाग क्रमांक १० क मध्ये भाजप तर्फे माजी नगरसेवीका शैला तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उज्वला काळे, शिवसेनेच्या वतीने सोनाली तापकीर यांच्यात सामना होत आहे. या ठिकाणी महायुती एकमेकांचे विरोधात लढत आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!