पाचवी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे संघाचा तिसरा विजय; किंग्ज्मन क्लब, कल्याण क्लब संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे यांच्या तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे संघाने तिसरा विजय तर, किंग्ज्मन क्लब आणि कल्याण क्लब संघांनी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत केतन पासलकर आणि संघातील गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर स्पार्टन क्रिकेट क्लबने टायटन बुल्स् संघाचा ६३ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन क्रिकेट क्लब संघाने १९.४ षटकात १९७ धावांचे लक्ष्य उभे केले. अभिषेक परांगे (४९ धावा), केतन पासलकर (२८ धावा) आणि पार्थी नाईकेर (२२ धावा) यांनी धावा करून संघाचा डाव बांधला. या लक्ष्याचा पाठलाग करताना टायटन बुल्स् संघाचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आला. सुनिल यादव याने ५८ धावांची खेळी करून प्रतिकार केला. निखील भोगले, वरूण श्रीखंडे, केतन पासलकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.
ऋत्विक महाजन याने फटकावलेल्या ६७ धावांच्या जोरावर कल्याण क्लबने रायझिंग चॅम्पियन्स् संघाचा ७० धावांनी सहज पराभव केला. ऋत्विक महाजन (६७ धावा) आणि रोहीत गुगळे (५८ धावा) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर कल्याण क्लबने २२६ धावांचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना रायझिंग चॅम्पियन्स्चा डाव १५६ धावांवर थांबला. सुश्रूत परचुरे याने केलेल्या ७९ धावांमुळे किंग्ज्मन क्लबने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा ४ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेत पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पार्टन क्रिकेट क्लब पुणेः १९.४ षटकात १० गडी बाद १९७ धावा (अभिषेक परांगे ४९, केतन पासलकर २८, पार्थी नाईकेर २२, किरण कनाबारगी ३-३६, विक्रम राव २-३३, संतोषकुमार सांगळे २-३७) वि.वि. टायटन बुल्स्ः १३.१ षटकात १० गडी बाद १३४ धावा (सुनिल यादव ५८ (२३, ५ चौकार, ५ षटकार), निखील भोगले २-८, वरूण श्रीखंडे २-१८, केतन पासलकर २-१७, कौस्तुभ देशपांडे २-२८); सामनावीरः केतन पासलकर;
कल्याण क्लबः १९.४ षटकात १० गडी बाद २२६ धावा (ऋत्विक महाजन ६७ (२९, ४ चौकार, ७ षटकार), रोहीत गुगळे ५८ (३३, ३ चौकार, ५ षटकार), पृथ्वीराज गायकवाड २२, देव्रत देशमुख ३-३६, कपिल कोर्लेकर २-३३, गौरव बाबर २-४९) वि.वि. रायझिंग चॅम्पियन्स्ः १७.१ षटकात १० गडी बाद १५६ धावा (हिकांत कामदार ३१, साजन मोदी ४६, रोहत ठाकूर ४-२७, राघव खेडकर २-२८); सामनावीरः ऋत्विक महाजन;
रियुनायटेड क्रिकेट क्लबः १९.३ षटकात १० गडी बाद १६६ धावा (शुभम खटाळे ५१ (४५, ४ चौकार, २ षटकार), राहुल नाईक २८, संकेत शिंदे २१, शुभम राजपुत ४-३०, मयुर क्षीरसागर २-२६) पराभूत वि. किंग्ज्मन क्लबः १९.५ षटकात ६ गडी बाद १६९ धावा (सुश्रूत परचुरे ७९ (५३, ७ चौकार, ६ षटकार), अमित डी. नाबाद ३०, मयुर क्षीरसागर २२, निखील कदम ३-२६); सामनावीरः सुश्रूत परचुरे.