
रौनक पटेल याने ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाने कल्याण क्लबचा तीन धावांनी निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाने २० षटकामध्ये १५४ धावांचे लक्ष्य उभे केले. रौनक पटेल (४९ धावा) आणि लहुकूमार राऊत (३९ धावा) यांनी धावांचे योगदान देत कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाचा डाव उभा केला. कल्याण संघाच्या जगदीश जोशी, आकाश शहा आणि पृथ्वीराज गायकवाड यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना कल्याण क्लबचा डाव १९.२ षटकामध्ये १५१ धावांवर मर्यादित राहीला. महेश शिंदे (२२ धावा), अरविंद चौहान (२० धावा) आणि जयराज गौड (२९ धावा) यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. कॉर्पोरेट विलोव्हर्सच्या राहूल बडगुजर याने तीन गडी तर, नितीन चौहान याने दोन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कॅप क्रुसडर्सः २० षटकात ९ गडी बाद १८८ धावा (लखन पारसे ५१ (४२, १ चौकार, ३ षटकार), सिद्धार्थ रोमन ३८, आदित्य साखरदंडे नाबाद २९, संजय इनामदार ४-३०) पराभूत वि. गट्स अँड ग्लोरीः १७.३ षटकात २ गडी बाद १८९ धावा (रणजीत कुलकर्णी ८६ (३९, ९ चौकार, ६ षटकार), कुणाल गुप्ता ५८ (४५, १ चौकार, ७ षटकार), गौरव धनवटे नाबाद २०, सुशील जाधव २-३३); सामनावीरः रणजीत कुलकर्णी;
कॉर्पोरेट विलोव्हर्सः २० षटकात ९ गडी बाद १५४ धावा (रौनक पटेल ४९, लहुकूमार राऊत ३९, जगदीश जोशी ३-१५, आकाश शहा ३-३०, पृथ्वीराज गायकवाड ३-३८) वि.वि. कल्याण क्लबः १९.२ षटकात १० गडी बाद १५१ धावा (महेश शिंदे २२, अरविंद चौहान २०, जयराज गौड २९, राहूल बडगुजर ३-२१, नितीन चौहान २-२७); सामनावीरः रौनक पटेल.