मराठीशहर

पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी / काँग्रेस व्याप्त भाजप’…!  

फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन..!  काँग्रेस’चे चोख प्रत्युत्तर …! 

Spread the love

पुणे .एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे व राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने राहुल गांधींची भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत असल्याने भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देशातील विरोधी पक्षाचे नेत्यावर अश्लाघ्य व अतार्किक टिका करत फडणवीस आपल्या बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन करत असल्याची प्रखर टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, खरेतर फडणवीसांना पीओके प्रमाणे प्रमाणे तुलनाच करायची असेल तर ती काँग्रेस नव्हे तर भाजप सोबतच चांगल्या पध्दतीने होऊ शकते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजप’ने भ्रष्टाचार मुक्त देशाची घोषणा करून एकीकडे ११ वर्षात ‘एकाही भ्रष्टाचारी नेत्यावर’ खटला चालवून, त्यास गजाआड टाकण्याचे काम केलेले नाही, तर उलटपक्षी ‘भ्रष्टाचार व्याप्त वा काँग्रेस व्याप्त भाजप’ करण्याचे पवित्र कार्य करून अनायसे काँग्रेस सह अन्य राजकीय पक्ष स्वच्छ करण्याचेच कार्य केले आहे.

देशाच्या “संरक्षण वा गृह खात्याची” जबाबदारी असलेले भाजप नेते, देशाच्या वा राज्याच्या सुरक्षा विषयक प्रश्नांवर वा आपल्या संविधानीक ऊत्तरदायीत्वावर चकार शब्द न बोलता वा स्वराजधर्माचे पालन न करता, जनतेने प्रश्न विचारण्यास निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरच अश्लाघ्य आरोप करण्यात धन्यता मानत असून आपल्या ‘राजकीय नादानपणाचे व बेजबाबदारपणाचे’ प्रदर्शन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर वा राष्ट्रीय प्रश्नांवर तारे तोडण्यापेक्षा, स्व-अखत्यारीतील व राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करावे, एमएमआरडीच्या हजारो कोटी भ्रष्टाचाराकडे लक्ष केंद्रित करावे तसेच कायदा – सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बीड, परभणी, बदलापूर, पुणे जिल्हा इ मधील खुनांच्या तपास प्रकरणांना गती द्यावी, धुळे मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत मिळालेल्या १॥ कोटी रकमे बाबत बोलावे, पोर्शे कार प्रकरणी, वाढत्या ड्रग्ज व सायबर गुन्हे प्रकरणी अधिक लक्ष केंद्रित करावे व ‘राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री’ नात्याने, जनतेप्रती संविधानीक कर्तव्यांची पुर्तता करावी व अपेक्षित राजधर्माचे पालन करावे.. असे खडे बोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!