खेलब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रायगड रॉयल्सची आगेकुच कायम

Spread the love

 

पुणे, १७ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत साखळी फेरीत सिद्धेश वीरच्या नाबाद ३३ धावांसह तनय संघवी(३-२५) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा २ धावांनी पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज विकी ओस्तवाल ८ धावांवर तंबूत परतला. रायगड रॉयल्स संघ ५ षटकात १ बाद २७धावावर असताना पाऊस सुरु झाला. पावसामुळे प्रत्येकी १९ षटकाचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रायगड संघ ५.१ षटकात १बाद ३३ धावा अशा स्थितीत असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. त्यामुळे पावसाच्या विश्रंतीनंतर हा खेळ प्रत्येकी १० षटकाचा करण्यात आला. रायगड रॉयल्स संघाने १० शतकात ३बाद ९३धावा केल्या. सिद्धेश वीरने २३चेंडूत ३चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ३३ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याला दिग्विजय पाटील १६, नीरज जोशी १२, ऋषभ राठोडने नाबाद ११ धावा काढून साथ दिली.

सातारा वॉरियर्स संघाला १०षटकात ८बाद ९१धावाच करता आल्या. सातारा वॉरियर्स संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पवन शहा(३), ओम भोसले(४), सौरभ नवले(९) हे झटपट बाद झाले. हर्षल काटेने एकाबाजूने लढताना चेंडूत धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. त्याने १चौकार व ४षटकार मारले. रायगड रॉयल्स कडून तनय संघवी(३-२५), शुभम कदम(१-९), निखिल कदम(१-११), सागर जाधव(१-२३) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स: १० षटकात ३बाद ९३धावा(सिद्धेश वीर नाबाद ३३(२३,३x४,१x६), दिग्विजय पाटील १६, नीरज जोशी १२, ऋषभ राठोडने नाबाद ११, समाधान पांगारे १-१४) वि. वि.सातारा वॉरियर्स: १०षटकात ८बाद ९१धावा(हर्षल काटे ४५(२४,१x४,४x६), वैभव चौघुले १६, तनय संघवी ३-२५, शुभम कदम १-९, निखिल कदम १-११, सागर जाधव १-२३); सामनावीर – तनय संघवी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button