मराठी

आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ ला राष्ट्रीय सन्मान

दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण परिषदेत 'बेस्ट मॅनेजमेंट कॉलेज इन महाराष्ट्र २०२५' पुरस्काराने गौरव

Spread the love

पुणे : नऱ्हे येथील ‘आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत सन्मान मिळवला आहे. सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च या संस्थेमार्फत ‘महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालय २०२५’ हा मानाचा पुरस्कार संस्थेला देण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील हॉटेल इरोज, नेहरू प्लेस येथे आयोजित १४ व्या राष्ट्रीय शिक्षण उत्कृष्टता परिषद आणि २५ व्या राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

एआयसीटीईचे संचालक डॉ. सुनील लुथरा यांच्या हस्ते हा पुरस्कार आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. अनिता नितीन खटके यांनी स्वीकारला. संस्थेचे व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच उद्योगाशी असलेली मजबूत बांधिलकी यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

ही संस्था जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चा भाग असून, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी पुण्यात विशेष ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर आणि सहसंस्थापक ॲड. शार्दूल जाधवर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हे यश शक्य झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!