गुरुवारी श्री पांडुरंगरायांचा पालखी सोहळा थोरल्या पादुका येथे विसावणार
भाविकांना श्रींचे दर्शनाची पर्वणी लाभणार :- ॲड. विष्णू तापकीर

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने विठ्ठल महाराज वासकर यांचे नियंत्रणात पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील वारीचे परतीचे प्रवासात श्री पांडुरंगरायांचा पालखी सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट वडमुखवाडी येथे गुरुवारी ( दि. २० ) मुक्कामी विसावणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली.
श्री पांडुरंगरायांचे पालखी सोहळ्याचे या ठिकाणी विसावण्याचे १६ वे वर्ष असून अखंड सेवा रुजू होत आहे. येथे मुक्कामात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या मध्ये संध्याकाळी सात चे सुमारास श्रींचे पालखी सोहळ्याचे आगमन व स्वागत हरिनाम गजरात होणार आहे. श्रींचे पादुकांची पूजा व आरती होणार आहे. सोहळ्यातील मान्यवर पदाधिकारी यांचे सत्कार, भाविकांना श्रींचे पादुका दर्शन, महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. या विसाव्यात मुक्कामी श्रींचे दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे



