ब्रेकिंग न्यूज़मराठी

आयु. बाळासाहेब भोसले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान गौरव

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक म्हणून २१ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या आयु. बाळासाहेब भोसले यांचा सेवानिवृत्ती निमित्त तक्षशिला बुद्ध विहार, आळंदी येथे सत्कार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खेड तालुका)माजी अध्यक्ष आयु. विश्वनाथ थोरात, सामाजिक कार्यकर्ते बाप्पूसाहेब रायकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

आळंदीतील सुप्रसिद्ध शिल्पकार व रांगोळी कलेतील नावलौकिक लाभलेले आयु. बाळासाहेब भोसले हे केवळ शिक्षकच नव्हे, तर कला व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव थोरात, विलास रणपिसे, सामाजिक कार्यकर्ते आनंद रणदिवे, नामदेव सुरपल्लीकर, अशोक थोरात, नितीन कुऱ्हाडे, किसन मोजाड, विनायक गायकवाड, संजय रंधवे, सुभाष भोसले, बाळू (तात्या) भोसले,चारुदत्त रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाद्वारे एकात्मतेचा, सन्मानाचा आणि प्रेरणेचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button