
–
पुणे, ३० जून: एसएनबीपी आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा अजिंक्यपद २०२५-२६ स्पर्धेमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल (पुलगाव) आणि एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल (रहाटणी) संघांनी १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
रविवारी एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या (चिखली) आर्टिफिशियल टर्फवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात रविवारी एनएससीबीएमएसने एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली संघावर २-० असा विजय मिळवला. जॉय चिंग याने (आठवे आणि २८ वे मिनिट) दोन्ही गोल करून त्यात मोलाचा वाटा उचलला.
एनएससीबीएमएसचे या स्पर्धेतील फुटबॉल प्रकारातील हे तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी, त्यांनी १२ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद बाजी मारली आहे.
मुली गटाच्या अंतिम सामन्यात, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणीने अकॅडमी स्कूलचा दोन गोलने (२-०) पराभव केला. अस्मी गोळे (१२ व्या मिनिटाला) आणि अनन्या यादवने (१२ व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करताना विजय सुकर केला.
मुलींच्या गटात एकूण १८ संघांनी भाग घेतला. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुली हा मुलींचा एकमेव वयोगट होता.
निकाल
१७ वर्षांखालील मुले:
पहिली उपांत्य फेरी: नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल, पुलगाव: २ (जॉय चिंग नववे, मोडेम विंझो २७वे मिनिट) वि. एसएनबीपी इंटरनॅशनल, मोरेवाडी: ०
दुसरी उपांत्य फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल चिखली: १ (पियुष दांगट १४वे मिनिट) वि. केंब्रिज स्कूल: ०
अंतिम फेरी: नेताजी सुभाष चंद्र बोस मिलिटरी स्कूल, पुलगाव: २ (जॉय चिंग नववे, २८वे मिनिट) वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली: ०
१७ वर्षांखालील मुली:
पहिली उपांत्य फेरी: द अकॅडमी स्कूल: १ (आर्य १९वे मिनिट) वि. एसएनबीपी, मोरेवाडी: ०
दुसरी उपांत्य फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी: १ (इप्शिता साबळे १४वे मिनिट) वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली: ०
अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी: २ (अस्मी गोळे १२वे, अनन्या यादव १२वे) वि. द अकॅडमी स्कूल: ०