सामान्य कार्यकर्त्यांना “आपल्यातलेच” वाटणारे रवींद्र चव्हाण – संदीप खर्डेकर.
"मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आणि रवींद्र चव्हाणांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल वृद्धाश्रमास मदत" - सतीश गायकवाड.

पुणे . रवींद्र चव्हाण यांचे राहणीमान अत्यन्त साध्या पद्धतीचे असून ते कोणताही बडेजावपणा करत नाहीत, सामान्य कार्यकर्त्याला “आपल्यातलेच” वाटणारे असे हे नेतृत्व आहे असे मत भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि गुणग्राहकतेला प्राधान्य देणारे असे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी ला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत असेही संदीप खर्डेकर म्हणाले. तर मालोजीराजे छत्रपती हे देखील “राजा” कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असून शाहू महाराजांचा वारसा ते उत्तमरित्या पुढे नेत आहेत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
सतीश गायकवाड मित्र परिवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने रवींद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी झालेली निवड आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवरत्न ओल्ड एज होम या वृद्धाश्रमास आवश्यक धान्याची मदत करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मा. नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गुरुद्वारा गुरुनानक दरबार चे अध्यक्ष चरणजीत सहानी, भाजपा उद्योग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष राजनभाई परदेशी, शैलेश बडदे, जयप्रकाश पुरोहित, गोविंदराव साठे,प्रवीण जाधव,सुनील महाजन इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतीश गायकवाड यांनी आपण कर्तव्य भावनेतून ही मदत करत असून आपला आनंद साजरा करताना ज्यांना खरंच गरज आहे अश्यांना मदत केली पाहिजे या भावनेतून दर वर्षी अश्या पद्धतीने सणासुदीला किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी आम्ही मदत कार्य करत राहू असेही गायकवाड म्हणाले.
येथील वृद्धाश्रमास भेट दिल्यावर अनिता राकडे ताईंचे सामाजिक जाणीवेतून ह्या निराधारांना सांभाळताना घेतलेले कष्ट बघून भरून आल्याची भावना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केली. हे वृद्धाश्रम माझ्या प्रभागात येत असून येथील ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय किंवा जे जे आवश्यक असेल ती मदत तसेच वृद्धाश्रमास सर्वतोपरी मदत करण्याचे वचन हरिदासजी चरवड यांनी दिले.
गुरुद्वारा गुरुनानक दरबार चे अध्यक्ष चरणजीत सहानी यांनी येथील परिस्थिती बघून दर महा लागणारे गहू व साखर वर्षभर भेट देण्याचा निर्धार जाहीर केला.
समाजातील दानशूरांच्या मदतीवरच मी येथवर वाटचाल करू शकले असे मत व्यक्त करत वृद्धाश्रमाच्या संचालिका अनिताताई राकडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री. मनोहर कोलते यांनी उपस्थितांचे स्वागत करताना येथील ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबीय यांना वाऱ्यावर सोडून देतात याबाबत खंत व्यक्त केली.
भाजप चा कार्यकर्ता हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्यावर भर देतो आणि नेमके तेच सतीश गायकवाड करत असल्याबद्दल संदीप खर्डेकर यांनी समाधान व्यक्त केले.
आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी रवींद्र चव्हाण व मालोजीराजे छत्रपती यांना भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले..
कार्यक्रम संयोजनात पुरुषोत्तम पिल्ले, हुसेन भाई शेख, शब्बीर भाई शेख,भिकन सुपेकर, बाळासाहेब लडकत, विजय तळ भंडारी, सतीश जंगम,संजय वावळ, चंद्रशेखर जावळे यांचा मोलाचा वाटा होता.