आळंदी शाळांत ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमांचा हरिनाम गजरात प्रारंभ
अभंग, भजन गायन, पसायदान गायन उत्साहात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळंदी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी व ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत राबविण्यात येत असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरी संस्कारक्षम मूल्य संवर्धन ( वर्ष तिसरे ) या उपक्रमाचा प्रारंभ हरिनाम गजरात झाला.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त, राष्ट्रीय युवा कीर्तनकार, ह.भ. प. पुरुषोत्तम दादा महाराज पाटील, संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. विजय गुळवे, सचिव वैष्णवी गुळवे, आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त, स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, अध्यापक ह.भ.प. भागवत महाराज साळुंखे, आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी विश्वस्त अर्जुन मेदनकर, सुहास सावंत, ओळख ज्ञानेश्वरी परिवार सदस्य धनंजय काळे, स्वकाम सेवा मंडळाचे सुभाष बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. सारंग जोशी यांच्या तर्फे ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला इंग्रजी भाषेतील पसायदान प्रतिमा भेट देत इंग्रजीतील पसायदान सर्वानी मुखोद्गत करण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठीसह आता इंग्रजी मध्ये देखील संत साहित्य निर्मिती होत असून परदेशातील भाविक, पर्यटक यांना समजेल अशा भाषेत संत साहित्य उपलब्ध झाल्यास अधिक प्रचार प्रसार होण्यास मदत होणार आहे. यासाठी इंग्रजीतील पसायदान भेट देत शालेय मुलांना इंग्रजी भाषेतही पसायदान म्हणणे सहज सुलभ झाले आहे. या वेळी डॉ. सारंग जोशी, ह. भ. प.भागवत महाराज साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून संस्थेस पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रा. विजय गुळवे यांनी केले. वनिता बैरागी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. तत्पूर्वी शालेय मुलांनी अभंग, भजन गायन, श्रींचे प्रतिमामा पूजन, ग्रंथ पूजन, दीप प्रज्वलन हरिनाम गजरात झाले.