आलंदीधर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

आळंदीत ग्रामदेवता काळभैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठापना लोकार्पण सोहळ्याचे आयोजन 

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ग्रामदेवता काळभैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठापना लोकार्पण सोहळ्याचे आयोजन श्रावण महिन्याचे पहिल्या सोमवारी ( दि. २८ ) सर्व देवदेवतांची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. या निमित्त भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष माऊली देवस्थानचे मानकरी राहुल चिताळकर पाटील यांनी दिली.

   लोकार्पण सोहळ्यात सर्व देवदेवतांची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक नगरप्रदक्षिणा मार्गावरून हरिनाम जयघोषात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. यावेळी झेंडे, तुळशी कलश डोक्यावर घेत लक्षवेधी मिरवणूक झाली. यासाठी भाविक, नागरिकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.

भव्य मिरवणूक, नगारखाना फटाक्यांची आतिषबाजी, ढोल, ताशाचा दणदणाट, घंटा ठणठणाट, वारकरी विद्यार्थी हरिनाम गजर, अब्दागिरी, भगवे पताका ध्वज, टाळ, वीणा, मृदंग त्रिनादात श्रींचे मूर्तीची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली. यावेळी नगारखानासह फटाक्यांची आतिषबाजी, ढोल, ताशाचा दणदणाट, घंटा नादेचा ठणठणाट, वारकरी विद्यार्थी यांचा हरिनाम गजर उत्साहात झाला.

लोकार्पण सोहळ्यात मंगळवारी ( दि. २९ ) प्रायश्चित संकल्प गणपती पुण्याहवाचन पंचांग कर्म मंडप प्रवेश सर्व मंडळांची स्थापना अरणी मंथन, नवग्रह हवन, जलधिवास कुटीर हवन महा आरती होणार आहे. बुधवारी ( दि. ३० ) शांतीयुक्त पठण, हवन स्नपन विधी, धान्य अधिवास, श्यधिवास, दिपत्सव नैवेध्य आणि महाआरती होईल. गुरुवार ( दि. ३१ ) शांतीयुक्त पठण, महाभिषेख, उत्तरांग हवन, श्रींचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, बलिदान कलशारोहन, महानैवेध्य, माहाआरती, पुरणाहुती प्राणप्रतिष्ठापना त्या नंतर श्रींची महाआरती होईल. महाप्रसादाने धार्मिक मंगलमय उत्साही वातावरणात हरिनाम गजरात श्रींचे लोकार्पण सोहळा सांगत होईल. सर्व नागरिक, भाविकांनी या सोहळ्यास सर्व कालावधीतील कार्यक्रमांसाठी उपिस्थत रहावे असे आवाहन आळंदीकर ग्रामस्थ यांनी केले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!