संविधानाच्या रक्षणसाठी तीव्र आंदोलन !

गेल्या ११ वर्षांपासून देशात RSS प्रणित सरकार असल्यामुळे “संविधान बदल” या RSS च्या ध्येलाला गती प्राप्त होत आहे. सरकारचे हे अभय असल्यामुळेच काही दिवसांपूर्वी पुणे शहरात “संविधान का बदलावे?” या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले.
सदर पुस्तकाच्या प्रकाशनास केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध केला. मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
सरकार पुरस्कृत या संविधान विरोधी कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पक्षाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान विरोधी प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करत अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या पवित्र संविधानाच्या प्रतींचे नागरिकांना मोफत वाटपही करण्यात आले.